शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

वसई-विरार महापालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 01:21 IST

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आशिष राणेवसई : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र तसेच जिम आणि स्विमिंग पूल वगळता मंगळवारपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली करण्यात आली आहेत. अनलॉक-२ व ३ मध्ये सम-विषम तत्त्वावर दुकाने आयुक्तांच्या निर्देशानुसार अजूनपर्यंत सुरू होती. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली असल्याने सोमवारी संध्याकाळी उशिरा वसई-विरार महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी याबाबतचे लेखी आदेश काढल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.राज्य सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यापूर्वी दुकानांसाठी पी-१ व पी-२ असा सम-विषम नियम लागू होता. त्यामुळे शहरात महिनाभरात साधारण १२ दिवस दुकाने खुली राहत होती. त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून कामगारांचा खर्च, दुकानाचे भाडे देणेही कठीण होते. त्यामुळे दोन्ही बाजूची दुकाने सातही दिवस खुली राहावीत यासाठी राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यावर निर्णय घेत मुंबईसह एमएमआर रिजनमधील आयुक्त यांनी आपापल्या स्तरावर सर्व दुकाने खुली ठेवता येतील का याचा सारासार विचार व आरोग्य सर्वेक्षण करून निर्णय घ्यावयाचा आहे, असे अधिकार प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी यापूर्वीची सम-विषम पद्धत दि. १७ आॅगस्टच्या आदेशानुसार बंद केली. दरम्यान, नव्या आदेशानुसार आता वसई-विरारमधील प्रतिबंध क्षेत्र तथा जिम व स्विमिंग पूल वगळता शहरातील सर्व दुकाने सुरू होत असल्याने आता छोट्या-मोठ्या दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: मद्यविक्रीच्या दुकानांचाही यात समावेश आहे. मद्यविक्रीची दुकानेही संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उघडी राहणार असून गर्दी न होता तोंडाला मास्क, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. शहरातील सर्व दुकानदारांनी कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा देखील महापालिकेने दिला आहे. आता गणेशोत्सव चार दिवसांवर असताना असे आदेश निघाल्याने वसईकरांना कोरोना संकटात हा एक दिलासा मिळाला आहे.>पालिका क्षेत्रात रुग्ण दर १४ टक्क्यांवर!शहरातील बाधित रूग्णसंख्या, मृत्यू व मुक्त संख्या कमी होण्याकामी विविध उपाययोजना मनपाने राबविल्या आहेत. यामध्ये जास्त रुग्णसंख्या असलेले क्षेत्र मोठे करून त्या भागात लॉकडाऊन करणे, गर्दी होणाºया दुकानावर व भाजी विक्रेत्यांवर कारवाई करणे, दंड आकारणी, शहरात चाचण्यांची संख्या वाढवणे, त्यामुळे सध्या वसई-विरारमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे आणि हा आकडा आता दिवसागणिक १४ टक्क्यांवर आलेला आहे, ही बाब नक्कीच दिलासादायक आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार