शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय उमेदवारांचे समर्थकांसह शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:26 IST

    शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांनी उमेदवार निश्चित करूनही एबी फॉर्म दिले नव्हते. त्यामुळे बहुतांशी इच्छुकांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास गर्दी केली. 

मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली; मात्र सुरुवातीच्या ४ दिवसांत सहा, सोमवारी ५९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी तर सर्वपक्षीय इच्छुकांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत मिरवणुका काढल्या आणि अर्ज दाखल केले.

    शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांनी उमेदवार निश्चित करूनही एबी फॉर्म दिले नव्हते. त्यामुळे बहुतांशी इच्छुकांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास गर्दी केली. 

त्यांना ज्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला ते खुशीत होते तर ज्यांची उमेदवारी नाकारली होती, अशा काहींचा संताप अनावर झाला होता तर काहींना अश्रूही अनावर झालेले दिसले.

उमेदवारी अर्ज भरण्याचा ३० डिसेंबर शेवटचा दिवस होता. सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज भरायचे असल्याने इच्छुकांनी आधीपासूनच तयारी करून ठेवली होती. बहुतांश इच्छुकांनी सकाळी देवदर्शन केले. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणापासून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत वाजत-गाजत मिरवणुका निघाल्या होत्या. 

रस्त्यांवर वाहतूककोंडीढोल-ताशा, बँड वाजवत फटाके फोडत, घोषणा देत उमेदवार कार्यकर्त्यांसह निघाल्याने ठिकठिकाणी रस्त्यांवर कोंडी झाली होती. अनेकांनी मिरवणुकीसह दुचाकी आणि चारचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.

अर्ज भरण्यासाठी केवळ उमेदवार आणि सूचक-अनुमोदक इतक्याच लोकांना आत सोडले जात होते. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे उमेदवारांसह आलेले समर्थक निवडणूक कार्यालया बाहेर रस्त्याच्या कडेला, झाडांच्या आडोशाला ताटकळत होते.

शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी असल्याने उमेदवारी अर्ज तपासून तो स्वीकारण्याकरिता उमेदवारांची आत रांग लागल्याने अनेकांनी बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना वाट न पाहता परत जाण्यास सांगितले. 

उमेदवारी अर्ज भरण्याची ३ वाजेपर्यंतची मुदत असली तरी ३ च्या आधी आलेल्या उमेदवारांचे उशिरापर्यंत अर्ज भरून घेण्याचे सुरू होते. मिरवणुकीतील कार्यकर्त्यांची अनेकांनी चहा-नाष्टा आदींची सोय केली होती. मीरा भाईंदर शहरात आज खऱ्या अर्थाने सर्वत्र निवडणुकीचे वातावरण अनुभवयाला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : All Party Candidates Display Strength with Supporters for Nomination

Web Summary : Mira Bhaindar witnessed a rush as all-party candidates filed nominations with supporters on the last day. Rallies caused traffic jams while tensions flared as some were denied party tickets. The city experienced a true election atmosphere.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६