शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

वसई किल्ल्यात मद्यपींना रोखले; दुर्गप्रेमींना आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:38 IST

आमची वसईसह सामाजिक संघटनांचा जागता पहारा

वसई/नालासोपारा : ऐतिहासिक वारसा असलेल्या वसई किल्ल्यात नववर्षानिमित्त दारूपार्टी, अश्लील चाळे आदी प्रकार सर्रास घडत असतात. या घटनांना आवर घालण्यासाठी भारतीय आमची वसईसह पुरातत्त्व विभाग, पालघर पोलीस यांच्यासह विविध संघटनांनी जागता पहारा देत मद्यपींना रोखून वसई किल्ल्याचे पावित्र्य जपले. त्यामुळे दुर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.हजारो मराठा सैनिकांच्या रक्ताने रंजित झालेल्या व त्यांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या ऐतिहासिक, जगप्रसिद्ध व केंद्र सरकारद्वारे संरक्षित अशा वसई किल्ल्यात युरोपीय सत्तेविरुद्ध भारताने पहिला विजय मिळवला होता. या किल्ल्यात इंग्रजी नववर्षानिमित्त ३१ डिसेंबर रोजी दरवर्षी शेकडोंच्या संख्येने लोक मद्यप्राशन करण्यास येत असतात. न्यायालय, पंचायत समिती कार्यालय, दंडाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाºया या किल्ल्यात दरवर्षी व वर्षभर हे प्रकार चालत असतात. अनेक दशकांपासून सज्जन नागरिकांमध्ये याविषयी संताप व खेद व्यक्त होत होता.‘आमची वसई’ या सामाजिक समूहाने गेल्या पाच वर्षांपासून वसईचे वैभव असलेल्या किल्ल्यात मद्य-व्यसन-अनैतिक प्रकारापासून मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. ३१ डिसेंबर रोजी टीम आमची वसईने भारतीय पुरातत्त्व विभाग व पालघर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने वसई किल्ल्यात जागता पहारा दिला. किल्ल्यात सायंकाळी ६ नंतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला. सुमारे १५० चारचाकी व ५० दुचाकी वाहनांना परत पाठवण्यात आले. मागील वर्षी वाहनांची संख्या अनुक्र मे ३५० व ५०० होती.आमची वसईने पुढाकार घेऊन राबवलेल्या या मोहिमेचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. अशाच मोहिमा प्रत्येक ठिकाणच्या दुर्गप्रेमी संस्थांनी राबवायला हव्या असे जागृक नागरिकांचे म्हणणे आहे. किल्ल्याचे महत्त्व सांगितल्यावर व प्रबोधनानंतर अनेक युवक युवतींनी यापुढे किल्ल्यात अनैतिक प्रकार करणार नाही व करू देणार नाही, असा निर्णय घेतला आहे. मद्यपान व अनैतिक प्रकार कायमस्वरूपी बंद कसे करण्यात येतील, यासंबंधी वसई पोलीस व पुरातत्त्व विभागाने उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. यापुढे किल्ल्यात अवैध मद्य वाहतूक, मद्यपान, अश्लील चाळे व अनैतिक प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.मागील दोन वर्षांपासून राबवली जाते मोहीममागील दोन वर्षांपासून ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून ते १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत पहारा दिला जातो. यंदा किल्ल्यावर आलेल्या अनेक कॉलेज तरु ण-तरु णीशी प्री-वेडिंग संस्कृती, किल्ले संवर्धन मोहीम, संवर्धन जागृती इत्यादी विषयावर मोकळेपणाने संवाद करून प्रबोधन करण्यात आल्याचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी सांगितले.