शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

आहो! पंचवटी नाका येथे दहशतवादी आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:00 IST

हॅलो, वसई पश्चिमेकडील पंचवटी नाका येथे एक काश्मिरी दहशतवादी पेहरावातील तरुण फिरत आहे असा फोन पालघर कंट्रोल रूमला आला

नालासोपारा : हॅलो, वसई पश्चिमेकडील पंचवटी नाका येथे एक काश्मिरी दहशतवादी पेहरावातील तरुण फिरत आहे असा फोन पालघर कंट्रोल रूमला आला आणि संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांची एक तास फिल्मी स्टाईल धावपळ झाली. एका तासाने संशयीत तरुण पोलिसांना गवसला आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नालासोपारा पोलिसांनी या घटनेनंतर चार जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी दुपारी वसई पश्चिमेकडील पंचवटी नाका येथे लांब दाढी, रंग गोरा, आर्मीसारखे टीशर्ट, काळी पॅन्ट, तोंडाला रुमाल, पोटावर मॅगेझीन सारखे दिसणारे पॉकेट, हातावर आयसीसच्या झेंड्यामधील असलेले पान अशा वेशभूषेतील दहशतवाद्यासारखा दिसणारा तरुण अंबाडी रोडवरील भारत बँकेचे सुरक्षा रक्षक अनिल रामदास महाजन यांनी पाहिला आणि पालघर कंट्रोलला कळविले. त्याठिकाणी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांनी ते गांभीर्याने घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, माणिकपूर पोलीस ठाणे, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी, तिन्ही उपविभागीय पोलीस अधिकारी, डीएसबी शाखा, सुरक्षा शाखा, वायरलेस, कोस्टगार्ड, कोळी व मच्छिमार सोसायट्या, एटीएस, सीमा शुल्क विभाग, बिट मार्शल, कस्टम या सर्वांना कळविले. सागर यांनी पंचवटीनाका येथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही चेक केले. सीसीटिव्ही यंत्रणेत हा संशयीत तिन ठिकाणी दिसून आला व ट्रॅव्हल्स बस ही दिसली. त्यानंतर बिट मार्शल व स्थानिक पोलीसांना ही बस सनिसटी गास येथे सापडली. सदर या ठिकाणी पोलिस पोहचले असता दहशतवादी वेशातील २० ते २५ तरुण पोलिसांना आढळून आले. त्या सर्वांना माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले होते. चौकशीअंती बातमी सत्य होती परंतू शीर्षक नसलेल्या हिंदी चित्रपटाचे ते चित्रीकरण (शुटींग) करत असल्याचे निष्पन्न झाली व गास सनसीटी परिसरात नालासोपारा पोलिसांकडून शूटिंगसाठी परवानगी घेतली होती. आर्टिस्ट बलराम धुलाराम जितावल, आर्टिस्ट अरबाज रझ्झाक खान, हिमालय हृदयनाथ पाटील आणि युनिट इन्चार्ज दत्ताराम सखाराम लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.>कोण आहेत अनिल रामदास महाजन : अनिल रामदास महाजन हे जम्मू काश्मीर येथे भारतीय सीमा सुरक्षा बलात १५ वर्षे नोकरी केली होती. सध्या ते सेवानिवृत्त असून भारत बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सीमेवर सुरक्षा करत असल्याने आयसीस या दहशतवादी संघटनेबाबत त्यांना माहिती आहे. संशयीत तरु णाच्या हातावर आयसीस संघटनेच्या झेंड्यामधील पान हे हातावर गोंदलेले असल्याने त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती.>एक कॅमेरा शहरासाठी ही संकल्पना आली उपयोगालाअप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी वसई येथे पदभार स्वीकारल्यानंतर सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि प्रत्येक शहरात एक कॅमेरा शहरासाठी ही संकल्पना अमालात आणली होती. या संकल्पनेनुसार मोक्याच्या ठिकाणी नागरिकांनी, दुकानदारांनी, इमारतीमधील राहिवाश्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. सोमवारी दहशतवादी आल्याची माहिती कंट्रोल रु मवरून मिळताच घटनास्थळी पोहचून पंचवटी नाका येथे संकल्पनेच्या माध्यमातून लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा प्रथम चेक केला आणि तो संशयीत एका बसमध्ये चढतांना दिसला. या आधारे एका तासाच्या आत फिल्मी स्टाईल धावपळ थांबली आणि तो तरु ण सापडला. जर त्या तरु णाचे चित्रीकरण झाले नसते तर पोलीस प्रशासन, कस्टम, एटीएस सर्व कामाला लागले असते.

टॅग्स :terroristदहशतवादी