शहरं
Join us  
Trending Stories
1
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
2
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
3
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
4
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
5
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
6
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
7
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
8
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
9
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
10
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
11
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
12
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
13
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
14
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
15
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
16
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
17
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
18
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
19
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
20
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आल्यानंतर भाजपाने विकास नव्हे तर विनाश केला - विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 02:30 IST

दिलेली आश्वासने भाजपला पूर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळेच केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.

बोईसर : भाजपाने विकासाचे स्वप्न दाखवून २०१४ मध्ये लोकांची मते घेऊन सत्ता मिळविल्या नंतर त्यांनी विकास नव्हे तर विनाश सुरु केला असल्याने कोकण किनारपट्टीवर ही संतप्त भावना असून येत्या काळामध्ये भाजप सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला .पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेस आघाडीचे संयुक्त उमेदवार दामोदर शिंगडा यांच्या प्रचारार्थ बोईसर येथील वंजारी समाज सभागृहामध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष सर्वच आघाड्यावर संपूर्णपणे अपयशी ठरला आहे.दिलेली आश्वासने भाजपला पूर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळेच केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. लोकांचा विरोध झुगारूनही वाढवण बंदर, नाणार रिफायनरीसारखे प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना देखील भाजपच्या या पापात सहभागी असून, या प्रकल्पांना असलेला त्यांचा विरोध तोंडदेखला आहे. त्यामुळे शिवसेना कितीही नाकारत असली तरी या पापातील आपला सहभाग त्यांना टाळता येणार नाही.ते पुढे म्हणाले की, भाजप-शिवसेनेचे हे सरकार बुलेट ट्रेन, बडोदा एक्सप्रेस-वेसारखे प्रकल्प आदिवासींवर लादते आहे. या प्रकल्पांमुळे आदिवासी, शेतकरी आणि मच्छीमारांवर मोठा अन्याय होणार असतांनाही भाजप आणि शिवसेनेचे सरकार याची दखल घ्यायला तयार नाही.त्यामुळेच या दोन्हीही पक्षांच्या विरु ध्द जनतेत प्रचंड रोष असल्याचे वारंवार दिसून आले आहे. नागरिकांमधील हा रोष लक्षात येत असल्याने अच्छे दिन आणण्याचे भाजपचे आश्वासन खोटे ठरले असून, आता उमेदवार सुध्दा इतर पक्षातून आयात करण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर ओढवल्याची बोचरी टीका विखे पाटील यांनी याप्रसंगी केली.या सभेला काँग्रेस आघाडीचे उमेदवार दामोदर शिंगडा, विधान परिषदेचे आमदार आनंद ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, विनायकराव देशमुख, यशवंत हाप्पे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे, प्रदेश सचिव मनिष गणोरे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दिवाकरराव पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संगीताताई धोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अनिल गावड,बोईसर शहराध्यक्ष रणबीर शर्मा, हनुमान सिंग, अरविंद सिंग क्षित्रय, सुभाषपाटील, संजय ज पाटील, मनिषाताई सावे, चंद्रकांत जाधव, जगन्नाथ पावडे, कर्णा त्रिवेदी, रामदास जाधव आदी नेते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. रणरणत्या उन्हातही सभेला चांगली उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018