शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
4
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
5
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
6
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
7
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
8
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
9
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
10
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
11
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
13
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
14
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
15
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
16
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
17
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
18
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
19
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
20
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार

खुनाचा आरोपी २९ वर्षांनंतर जेरबंद, सफाळे ठाण्यातून काढला होता पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 12:37 PM

Crime News: कोठडीत असताना सफाळे पोलिस ठाण्यातून पळालेल्या आरोपीला २९ वर्षांनंतर मूळगाव आसमा खत्री फलिया (जि. बलसाड) येथून जेरबंद करण्यात आले. ही कारवाई पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

 पालघर - कोठडीत असताना सफाळे पोलिस ठाण्यातून पळालेल्या आरोपीला २९ वर्षांनंतर मूळगाव आसमा खत्री फलिया (जि. बलसाड) येथून जेरबंद करण्यात आले. ही कारवाई पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. हरेश बाबू पटेल (वय २५, रा. आगरवाडी, मूळगाव बलसाड) असे आरोपीचे नाव आहे.

सफाळे भागातील आगरवाडी येथील जीवदानीपाडा येथे राहणाऱ्या महादेव चौधरी यांच्या वाडीत मोहन दुबळी यांचा १९ एप्रिल १९९५ साली खून झाला होता. याची माहिती सफाळे पोलिसांना मिळाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी हरेश पटेल या आरोपीला सफाळे पोलिसांनी आसमा (खत्री फलिया, तालुका पारडी, जिल्हा बलसाड) येथून ताब्यात घेतले हाेते.  दोघेही सफाळे भागात इमारत बांधकाम करीत असताना त्यांच्यात वाद झाला होता. वादाचे पर्यवसान हाणामारीत हाेऊन  आरोपीने त्याच्या डोक्यात फावडा घालून जीवे मारले होते. याप्रकरणी  खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पालघर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीत असताना पटेल याने २६ एप्रिल १९९५ रोजी पहाटे पळ काढला होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल विभुते यांच्यावर कामगिरी सोपवली होती. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे, राजेश वाघ, हवालदार राकेश पाटील, मधुकर दांडेकर यांची पथके तपासासाठी रवाना केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघर