शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाला ढिसाळ नियोजनाचा फटका

By admin | Updated: January 31, 2017 03:31 IST

राज्याच्या आदिवासी विभागासह शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका पालघर येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय

- हितेन नाईक, पालघरराज्याच्या आदिवासी विभागासह शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका पालघर येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाला बसला असून माहितीच्या अभावा मुळे बचत गटांनी मोठ्या उमेदीने लावलेल्या स्टॉल कडे प्रेक्षक व खरेदीदार पोहचू न शकल्याने त्यांनी निर्मिती केलेल्या वस्तूंची विक्र ीच होऊ शकलेली नाही.राज्यातील बचतगट, आदिवासी कलाकाराना स्वावलंबी बनवून दुर्मिळ वनोऔषधी चा फायदा सर्वाना व्हावा ह्यासाठी पालघर च्या लायन्स क्लब सभागृहात २७ जानेवारी रोजी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन पालघर जिल्ह्यातील वारली पेंटींगचे प्रसिद्ध चित्रकार मधुकर वाडू यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवास आदिवासी आयुक्त नरेंद्र पोयाम, सहाय्यक आयुक्त एस.टी.भालेकर तसेच अधिकारी सरोजनी क्षिरसागर, व इतर सांस्कृतिक अधिकारी उपस्थित होते.या महोत्सवात आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्र ी साठी आदिवासी बहुल ग्रामीण भागातील बचत गटांनी बनविलेल्या वस्तू चे प्रदर्शन आणि विक्र ी २७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान ठेवण्यात आली होती. प्रदर्शनात २१ स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे, या स्टॉलवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून ६० आदिवासी कलाकारानी व महिला बचत गटांनी स्वहस्ते बनविलेल्या वस्तुचे प्रदर्शन माडले आहे.पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असला तरी या जिल्ह्यातील प्रेक्षक अश्या कार्यक्र मांना भरभरून प्रतिसाद देत असतो, इतकेच नव्हे तर अशा हस्तकला व विक्र ी प्रदर्शनात खरेदी करून आपले या समाजापोटी असलेले कर्तव्य पार पाडत असतो.राज्याच्या आदिवासी विभागाने पालघर जिल्ह्यात घेतलेल्या ह्या हस्तकला व विक्री प्रदर्शनाची जाहिरात, पोस्टर्स कुठे लावण्यात आल्याचे अथवा वृत्तपत्र प्रतिनिधीं सह नागरिकांना ह्याची पुरेशी कल्पना नसल्याने हा शासनाचा कार्यक्र म अपयशी ठरला व त्याचा मोठा फटका मात्र विविध भागातून आलेल्या गरीब बचत गटांना बसला.या प्रदर्शनात गवता पासून विविध वस्तू व धान्य पासून खाद्य पदार्थ, तसेच पेपर मेसी, मखवटे, मुर्त्या, आदिवासी वारली चित्रकला,लाकडी वस्तूवर कोरीव काम, व रेखाटन, बांबू पासून विविध वस्तू, पेपर क्र ाफ्ट, वीण काम, झाडाच्या मुलं पासून विविध नक्षीदार व पक्षी, आदी सह मधुमेह, मूत्र आजार, यावर आयुर्वेदिक तसेच वन औषधी विक्र ीसाठी प्रदर्शनात मांडन्यात आले आहेत. परंतु ह्या प्रदर्शनाची माहिती प्रसिद्ध करण्यास प्रशिक्षण संस्था अपयशी ठरल्याने त्याचा मोठा फटका ह्या स्टॉल विक्र ेत्यांना बसून परत पावली घरी जाण्यासाठीचा खर्च हि सुटला नसल्याचे राणी लक्ष्मी बाई सहाय्यता बचत गट संघाच्या महिलांनी डोळ्यात पाणी आणित लोकमतला सांगितले.जिल्ह्यातील आदिवासींना माहितीच नाहीजिल्ह्यात एक हजाराहून गावे व पाच हजार पाडे आहेत, मात्र एकाहीं गावात अथवा पाड्यातील नागरिकांना या प्रदर्शन व विक्र ी बाबत पुसटशी देखील कल्पना नसल्याने आदिवासी समाजासाठी शासनाचे धोरण राबविणार मंडळीच्या उदासीनतेमुळे पालघर जिल्ह्यात आयोजित केलेल्या या प्रदर्शन व विक्र ी कार्यक्र माचा पुरता बोजवारा उडाला असून बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सक्षम बनविण्याचा हेतू असफल होत आहे.तसेच त्या पोटी खर्च होणारे लाखो रु पये वाया गेले असून कागदोपत्री हे प्रदर्शन यशस्वी झाल्याचे भासवून वरीष्ठां कडून आपली पाठ थोपवून घेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. शासनाचे लाखो रु पये वाया : आदिवासीच्या कला संस्कृती व जीवनावर आधारित या संस्थेने तयार केलेले लघूपट या महोत्सवात ३ दिवस दाखिवण्यात आले, मात्र त्यासंबंधित माहिती लोकांपर्यंत पोहचिवण्यास संबंधित विभागाचे अधिकारी अपयशी ठरल्याने ते पाहण्यासाठी एकही प्रेक्षक फिरकला नसल्याचे कळते. विशेष म्हणजे या स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रारातील १० नृत्य पथकांना आमंत्रित करण्यात आले होते मात्र ते देखील पुरेश्या प्रमाणात पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे शासनाचे लाखो रु पये वाया गेले आहेत.भीमा शंकरच्या जंगलातून वनौषधी आणून मोठ्या महत्प्रयासाने बनविलेली औषधे विक्र ीसाठी आणली मात्र फार थोडी विक्री होते. - मारु ती जाधव (गुरूजी), आदिवासी सेवक पुरस्कार विजेते.दिवस रात्र मेहनत करून पालघर शहरात हस्तकलेच्या अनेक वस्तूची विक्र ी होईल म्हणून अनेक वस्तू बनविल्या मात्र खरेदीदारच येत नसल्याने रिकामी हाताने बसावे लागते. - चंद्रकांत वाडे, नाशिकह्या प्रदर्शनाची माहिती प्रसिद्धीसाठी माहिती संचनालय आणि मुंबईच्या पत्रकारांना दिली होती. काही त्रुटी राहिल्या असतील पुढच्या वेळी काळजी घेऊ. - सरोजिनी क्षीरसागर, सांस्कृतिक अधिकारी