शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता नोंदीबाबत प्रशासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:16 IST

उत्तर कोकणातल्या पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी व खाडी परिसरात आणि पश्चिम घाटाच्या कुशीत जैवविविधता ठासून भरली आहे.

हितेंन नाईक/अनिरुद्ध पाटीललोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील सागरी किनारा, खाडी आणि पश्चिम घाटाच्या रांगांतील परिसंस्था जैवविविधतेने संपन्न असल्याने येथे विविध हंगामात शेकडो देशी-परदेशी पक्षी आणि वन्य प्राण्यांचा वावर आढळतो. ही जैवविविधता भविष्यात टिकून राहावी यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक जैवविविधता नोंदविण्यासाठी वह्या वाटप केल्या आहेत. मात्र त्या नोंदीअभावी कोऱ्या असल्याचे वास्तव राज्य जैवविविधता मंडळाच्या पत्राने समोर आल्याने जैवविविधतेबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून आले आहे.उत्तर कोकणातल्या पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी व खाडी परिसरात आणि पश्चिम घाटाच्या कुशीत जैवविविधता ठासून भरली आहे. वैशिष्ट्यपूर्ण व विपुल प्रमाणात अनेक जातींचे प्राणी, वनस्पती व पक्षी आहेत. मात्र या जिल्ह्यातील लोक जैवविविधता समित्यांनी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडे सादर केलेल्या नोंदवह्यांमध्ये त्याबाबत पुरेशी नोंद केली नसल्याचे समोर आले आहे. टप्पा २ मधील नोंदी करताना या जैवविविधतेची सविस्तर माहिती नोंदवून या मंडळाच्या कार्यालयात सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात विविध हंगामात देशी-परदेशी शेकडो पक्ष्यांचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. वन विभागानेही त्याची दखल घेतली आहे.गेल्या आठवड्यात यूरोपियन कलहंस दाखल झाले. तसेच चक्रवाक, लेसर व्हिसलिंग, पेंटेड स्टोर्क, ग्लॉसी आयबीस, ब्लॅक हेडेड आयबीस, फ्लेमिंगो आदी पक्ष्यांच्या थव्यांचे दर्शन चिंचणी, तारापूर, केळवे येथे होत असते. मागील अनेक वर्षांपासून या पक्ष्यांनी या भागाला पसंती दिल्याची माहिती स्थानिक पक्षी निरीक्षकांनी दिली. डहाणू उपवन संरक्षक कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना जैवविविधता नोंदवह्या वाटप केल्या आहेत. त्यापैकी चिंचणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नीलेश जाधव यांनी वही मिळालीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिंचणी गावात विविध पक्ष्यांचा वावर असताना, त्याची नोंदच ग्रामपंचायतीने आजपर्यंत केलेली नाही. परंतु ४ जानेवारी २०२० रोजी त्यांना वह्या दिल्याची माहिती बोईसर वनपरिक्षेत्राचे अधिकारी एन. एल. मोरे यांनी दिली. त्यामुळे जैवविविधता टिकून ठेवण्याबाबत प्रशासन पातळीवर उदासीनता दिसून येत आहे.

या विषयाच्या अनुषंगाने माहिती घेतो. शासन पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न केला जाईल.- सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पालघरजैवविविधता नोंदवही अद्याप प्राप्त झाली नसून ग्रामपंचायतीला निधीही वर्ग झालेला नाही.- नीलेश जाधव, ग्रामविकास अधिकारी, चिंचणी ग्रामपंचायत, ता. डहाणू.