शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

रिक्त पदांवरून चालतोय नगरपंचायतींचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 3:12 AM

ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़.

विक्रमगड : ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़. कारण नगरपंचायतीच्या निर्मितीपासून गेल्या दोन वर्षामध्ये येथील सर्वच पदे रिक्त आहेत एकही पद शासनाने भरलेले नाही़ त्यामुळे सध्या तरी तीचा कारभार हा रिक्तपदांवरच हाकला जात असल्याने विकास कामांना मोठी खीळ बसली आहे़विक्रमगड नगरपंचायतीचे कामकाज मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वखाली सुरु झाला त्यास दोन वर्षाचा काळ लोटलेला आहे़ मात्र तो नगरपंचायतीकरीता असलेली १५ कर्मचाऱ्यांची पदे न भरताच सुरु करण्यांत आल्याने विकासकामांना गती कशी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या अनुषंगाने नगरपंचायतीतील शासनाने सर्व रिक्त पदे भरा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे़नगरपंचायतीचा कारभार सुरु करण्या आधी नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे. तसेच नगरपंचायतीची मांडणी सुनियोजितपणे करणे व नगर रचना योजना लागू करुन नियोजनबध्द विकासासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमणे आवश्यक होते. मात्र त्यांचीच उणिव भासते आहे़ फक्त मुख्याधिकारी हेच पद भरण्यात आलेले आहे़विक्रमगड नगरपंचायतीमध्ये यशवंतनगर, टोपलेपाडा, नवापाडा, संगमनगर, शिंपीपाडा, पडवळेपाडा, रोहिदासनगर, गभालेपाडा, दिवेकरवाडी, विक्रमगड, वालीपाडा, कातकरीपाडा, वाकडुचापाडा, पाटीलपाडा समाविष्ट आहेत. सर्व मिळून १० हजार लोकसंख्या असलेली व १७ वॉर्ड असलेली नगरपंचायत अस्तित्वात आलेली आहे येथे यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार चालविला जात होता. मात्र या काळात गावाचा विकास होणे. जनतेच्या समस्या, त्यांच्या तक्रारी याचे निराकरण होणे त्यांना मिळणा-या मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे अपेक्षित होते. परंतु या पैकी काहीही झालेले नाही. ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत अस्तित्वात आली हा प्रशासकीय बदल सोडला तर कशातही फरक पडलेला नाही. त्यामुळे या नगरपंचायतीचे करावे तरी काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. विविध प्रश्नांची उकल गेल्या अनेक वर्षापासून झालेली नव्हती. तशी ती आता नगरपंचायत झाली तरीही झालेली नाही. मग या परीवर्तनाचा उपयोग काय?नगरपंचायतीकरिता शासनमान्य मंजूर पदांचा तपशीलनगरपंचायतीची एकंदरीत लोकसंख्या आजच्या घडीला १० हजारापर्यत आहे़ या लोकसंख्येच्या आधारावर नगरपंचायतीमधील गाव पाडयांच्या विकासासाठी मंजूर पदांमध्ये १)सहायक कार्यालय अधिक्षक, २)सहायक मालमत्ता पर्यवेक्षक, ३)सहायक सार्वजनिक बांधकाम अभियंता, ४)सहायक पाणीपुरवठा अभियंता, ५)सहायक नगररचनाकार, ६)सहायक समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी, ७)करनिरिक्षक, ८) लेखापाल, ९)लिपिंक टंकलेखक, १०)गाळणी चालक, वीजतंत्री, जोडारी, ११)पंप आॅपरेटर, वीजतंत्री, जोडारी, १२)शिपाई, १३)मुकादम, १४)व्हॉल्व्हमन, १५)स्वच्छता निरिक्षक़ अशी एकुण मुख्याधिकारी वगळता १५ पदे आहेत. त्यापैकी एकही पदे भरलेले नाही़त्यामुळे आज मितीस या नगरपंचायतीच्या विकासाला खिळ बसलेली आहे़पदांकरीता आकृतीबंध मंजूर झाल्यावर शासनाकडून ती भरण्यात येतील कारण या पदांची भरती महाराष्टÑशासनाकडे आहे. ती भरण्यासंदर्भात मी पत्रव्यवहार देखील केलेला आहे़- डॉ़ धीरज चव्हाण,मुख्याधिकारी नगरपंचायतशासनाने शहरीभागातील मुख्य ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला खरा मात्र त्यामध्ये असलेली सर्वच पदे रिक्त आहेत़ त्यामुळे नगरपंचायतींना सोयी सुविधा पुरविणे, प्रशासकीय मांडणी करणे, नगररचना लागू करणे, गाव-पाडयांचा विकास करण्याकरीता तज्ज्ञ कर्मचारी आवश्यक आहेत. -रविंद्र खुताडे, नगराध्यक्ष

टॅग्स :newsबातम्याVasai Virarवसई विरार