शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या होळीला पुरणाचा नव्हे कोंबडीचा नैवेद्य

By admin | Updated: March 12, 2017 02:01 IST

येथील आदिवासी संस्कृती आपल्या चाली रितींमुळे आपले वेगळेपणा नेहमीच अधोरेखीत करते. खरतर हा सण पुरणपोळीचा म्हणून प्रसिद्ध असला तरी तालुक्यातील वारली,

- हुसेन मेमन, जव्हार

येथील आदिवासी संस्कृती आपल्या चाली रितींमुळे आपले वेगळेपणा नेहमीच अधोरेखीत करते. खरतर हा सण पुरणपोळीचा म्हणून प्रसिद्ध असला तरी तालुक्यातील वारली, कातकरी समाजाच्या विशिष्ट समूहात कोंबडीचा नैवेद्य दाखवून होळी मातेला मान दिला जातो. घरातील कच्चा बच्चांना नवे कपडे, मुलगा असेल तर हातातील कडा आणि मुलगी असेल तर हार अशी ही परंपरा आहे. पेटत्या होळीत आपल्या कुटुंबाच्या इडापिडा जावो म्हणत श्रीफळ अर्पण करण्यात येते.विविध प्रकारच्या जाती समूहांमधील विविध प्रकारचे सण साजरे करण्यात येतात. यामध्ये मी पाहीलेली जव्हारची होळी सण एक आठवण. आम्हाला शेतीतून चांगले धनधान्य येऊन आमच्यातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश होऊ दे या भक्ती भावाने होळी केली जाते. या भागात होळी हा सण लहान होळीपासून ते रंगपंचमी पर्यंत साजरा केला जातो. यामध्ये दारुला अधिक मागणी असते. कुणी कुणावर चिखल फेकले किंवा गढुळ पाणी जर टाकले तर राग मानला जात नाही, मी सहजच एक प्रश्न त्यापैकी एका व्यक्तीला केला तुम्हाला याचा राग वगैरे येत नाही का? यावर त्या व्यक्तीने सांगितले की, हँसी मजाकचा सण आहे, बुरा न मानो होली है, म्हटले की सारे काही चालते.येथील भागात प्रामुख्याने कोकणा, वारली, ठाकुर व इतर आदिवासी बांधव आहेत. गाव पाडयावरील सर्वच रहीवासी या सणासाठी काहीतरी खास करायच्या तयारीत असतात. एकेकाळी लंगोटीवर राहणारे येथील बांधव आता बरेच प्रगत झाले असले तरी त्यांनी आपल्या सण साजरे करण्याच्या परंपरा बदललेल्या नाहीत. जव्हारपासून अवध्या तीन किलोमीटरच्या अंतरावर कापरीचापाडा हे गाव आहे. या ठिकाणी ठाकूर समाजाचे वास्तव्य आहे. गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर ेहे बांधव आडवा बांबू धरून उभे राहतात व पोस्त मागतात. मनासारखे पोस्त मिळाले की ते सुंदर नृत्य करून दाखवितात. पोस्त नाही मिळाले तर ते तुम्हाला रंगाने अथवा पाण्याने भिजवून टाकतात. आता पोस्त म्हणजे काय तर बक्षिस म्हणून पैसे देणे. समोरचा जितका तालेवर असेल त्यानुसार त्याने पैसे द्यावे, अशी त्यांची अपेक्षा असते. १५ ते २० स्त्री- पुरूषांचे असे गट अशा रस्त्यांवर ठिकठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचे तरपा नृत्याचे सादरीकरण लयबदध नाच, वादक सगळंच विलक्षण असत.