शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

तारापूरच्या ६ उद्योगांवर उत्पादन बंदची कारवाई

By admin | Published: April 26, 2017 12:02 AM

पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तारापूर एम. आय. डी. सी. मधील सहा उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद ची करवाई केली आहे.

पंकज राऊत / बोईसरपर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तारापूर एम. आय. डी. सी. मधील सहा उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद ची करवाई केली आहे. तसेच दोन उद्योग तात्पुरते बंद तर एका उद्योगाला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. डिसेंबर २०१६ पासून ही तिसरी करवाई असून या पूर्वी एकूण ४९ उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. तारापूर एमआयडीसीतील उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रि या न करताच ते सरळ नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येत असल्याने त्याचा पर्यावरण व किनारपट्टी भागात गंभीर परिणाम होऊ लागल्याने अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केल्या होत्या. लवादाने त्यांची गंभीर दखल घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक करवाई सुरु आहे डिसेंबर २०१६ रोजी ३२ उद्योग त्यानंतर फेब्रुवारी २०१७ रोजी १८ उद्योग तर आज आरती ड्रग्स लि., कॅमीकल फाईन केमिकल्स लि., रामदेव केमिकल्स, सिक्वांट सायंटीफिक, युनियन पार्क केमिकल्स, आशिष इंटरमीडिएट या ६ उद्योगावर बंदची कारवाई करण्यांत आली असून सारेक्स केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स प्रॉडक्ट आॅफ इंडिया लि. या उद्योगांचे उत्पादन तात्पुरते बंद तर ग्रीन फील्ड केमिकल्सला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.तारापूर एमआयडीसी मधील उद्योगांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असे संकेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडलाच्या अधिकाऱ्यांनी तारापूरच्या उद्योजकांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या मागील आठवड्यातील बैठकीत देण्यात आले होते. तिला तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा), तारापूर एन्व्हॉयरमेंट प्रोटेक्शन सोसायटी (टी.ई.पी.एस.)चे पदाधिकारी, उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशाबाबत मार्गदर्शन करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणा संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून गंभीरपणे दक्षता घ्या, प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याकरीता नवीन आणि वेगवेगळ्या टेक्नोलॉजीचा वापर करास असे आवाहन करण्यात आल्या नंतर शनिवारी रात्री मंडळाच्या वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून सर्वेक्षण केले त्या मधे दोषी आढळलेल्या उद्योगांवर कारवाई केली आहे. (वार्ताहर)