शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांविरुद्धची कारवाई थंड, रुग्णांचे प्राण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 03:51 IST

वसई-विरार महानगरामधील बोगस डॉक्टरांविरुद्धची महापालिकेची कारवाई सध्या थंडावली आहे. त्यामुळे या डॉक्टरांची दुकानदारी जोरात पुन्हा सुरु झाली आहे.

नालासोपारा : वसई-विरार महानगरामधील बोगस डॉक्टरांविरुद्धची महापालिकेची कारवाई सध्या थंडावली आहे. त्यामुळे या डॉक्टरांची दुकानदारी जोरात पुन्हा सुरु झाली आहे. परंतु महापालिकेचा आरोग्यविभाग मात्र ती जोरात सुरु असल्याची ग्वाही देत आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर आरोग्य विभागाने नालासोपारा येथे काही दिवसांपूर्वी भोंदू डॉक्टर शोधमोहिम घेऊन अशा सहा डॉक्टरांवर कारवाई केली होती. मात्र आता ही शोधमोहिम पुन्हा मंदावल्याने परागंदा झालेले बोगस डॉक्टर शहरात पुन्हा सक्रीय झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे याबाबत चौकशी केली असता आमची ही मोहिम अजुनही सुरूच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.वसई विरार व नालासोपारा शहरातील अनेक भागात भोंदू डॉक्टरांनी आपले दवाखाने थाटले आहेत. या बोगस डॉक्टरांकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नाही. धक्कादायक बाब म्हणजे रूग्णांच्या जिवीतास धोका निर्माण होतील अशा कालबाह्य व अपायकारक औषधांचा हे भोंदू डॉक्टर रूग्णांवर मारा करीत असतात. अशा सहा बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल केले होते. यानंतर अनेक बोगस डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केले होते. नागरिकांनाही बोगस डॉक्टरांवर चाप बसला असे वाटले. मात्र पालिकेची मोहीम पुन्हा थंडावल्यामुळे हे बोगस डॉक्टर पुन्हा आपले दवाखाने थाटून रुग्णांच्या जीवांशी खेळत आहेत.महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र चव्हाण यांनी बोगस डॉक्टरविरोधातील पालिकेची शोधमोहिम मंदावली नसून, प्रत्येक महिन्यात आमचे आरोग्य पथक त्यावर काम करीत आहे. बोगस डॉक्टरविरोधात तक्रार आल्यास आंम्ही तात्काळ त्यावर कारवाई करू असे सांगत असून शोधमोहिम थंडावल्याचा मात्र त्यांनी इन्कार केला.डॉक्टर बोगस : औषधे, इंजेक्शनेही बोगसपालिकेच्या आरोग्य विभागातील पथकाने गेल्या महिन्यात छापा टाकल्यानंतर या भोंदू डॉक्टरांचे प्रताप पाहून वैद्यकीय अधिका-यांना धक्का बसला. या डॉक्टरांकेडे कुठल्याच प्रकारची पदवी नव्हती. त्यांचे शिक्षणही पूर्ण झालेले नव्हते.बंदी असलेली, कालबाह्यझालेली औषधे, जिवितास धोका निर्माण करणारी इंजेक्शने भूल देण्याची, सुन्न करणारी घातक औषधे या डॉक्टरांच्या दवाखान्यात होती. त्यांचा वैद्यकीय शिक्षणाचाही काहीही संबंध नव्हता तरी ते अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करून रुग्णांच्या जीवाशी खेळत होते.गेल्या महिन्यात नालासोपा-यात बोगस डॉक्टरांवर केली होती कारवाईशहरातील बोगस डॉक्टरांविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार मोहीम उघडली होती. त्यावेळी नालासोपारा येथून ६ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली. त्यापैकी एक डॉक्टर पळून गेला. या डॉक्टरांकडे कुठल्याच प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नव्हते आणि बंदी असलेली, हानीकारक औषधे ते रुग्णांना देत असल्याचे आढळून आले. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी होणे आवश्यक असते. मात्र अशा नोंदणीशिवाय हे डॉक्टर व्यवसाय करीत होते.

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरVasai Virarवसई विरार