शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 19:25 IST

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला उत्तरप्रदेशातून पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले.

मंगेश कराळे

नालासोपारा  - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला उत्तरप्रदेशातून पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे. १४ नोव्हेंबरला रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीला तिच्या राहते बिल्डींगचे खाली असलेल्या किराणा दुकानातुन साखर घेवून घरी येत असताना एका आरोपीने ९ वर्षीय पीडित मुलीला तेरी मम्मी तुझे आवाज दे रही है असे खोटे बोलुन तिचे तोंड दाबुन तिला खेचत आडोश्याला नेऊन तिचेवर लैंगिक अत्याचार करुन घटनास्थळावरुन पळुन गेला होता. सदर बाबत तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर संवेदनशील घटनेची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपी निष्पन्न करुन अटक करणे बाबत सूचना दिल्या होत्या. 

दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेचे ३ पोलीस पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचा तांत्रीक विश्लेषण व  माहिती प्राप्त करुन आरोपी विशाल कनोजिया (२३) याला २५ नोव्हेंबरला वाराणसी शहरातून गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने, एस.टी.एफ. यांचे मदतीने ताब्यात घेवुन अटक केली. आरोपीचा ट्रान्झीट रिमांड घेवुन त्याला पुढील कारवाईसाठी तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, सचिन घेरे, मनोज सकपाळ, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, युवराज वाघमोडे, म.सु.ब. गणेश यादव, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपाराUttar Pradeshउत्तर प्रदेश