शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मोक्कामध्ये १० वर्षे शिक्षा भोगून सुटलेल्या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अग्नीशस्त्रासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 22:18 IST

आरोपीच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मंगेश कराळे

मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यात नाशिक जेलमध्ये १० वर्षे शिक्षा भोगून सुटलेल्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने १ अग्निशस्त्र, ८ जिवंत काडतुसे आणि रोख रकमेसह मंगळवारी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मिरा-भाईन्दर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील विशेषत: वसई-विरार परिसरात अवैध शस्त्रांवर आळा बसणे करिता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मार्गदर्शनात्मक सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार गोपनीय माहिती काढून कर्तव्य करित असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे यांना एकाकडे अग्नीशत्र असल्याची माहिती मिळाली. तसेच तो रशिद कंपाउंड याठिकाणी येणार असल्याची बातमी समजली. सदर बातमीचे अनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटिकरण पथकाने सापळा रचून मंगळवारी अजय बलराम मंडल (३५) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे विनापरवाना १ गावठी बनावटीचा कट्टा, ८ जिवंत पितळी धातुचे काडतुसे व रोख रक्कम असा एकूण ४१ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. 

पोलीस आयुक्तालयात प्राणघातक हत्यारे जवळ बाळगण्यास मनाई आदेशाचा भंग केल्याने त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.    आरोपी अजय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध डीसीबी मुंबई, एल टी मार्ग, आर ऐ के मार्ग या पोलीस ठाण्यात मोक्का, दरोडा, आर्म्स ऍक्ट, सरकारी कामात अडथळा असे आठ गुन्हे दाखल आहेत. 

आरोपीला बुधवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वसंत लब्दे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी