शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर गर्दी आणि मारामारी करुन दहशत माजविणा­ऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2023 18:24 IST

गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): बेकायदेशीर गर्दी व मारामारी करुन अग्निशस्त्राने दहशत माजविणा­ऱ्या आरोपीला अग्निशस्त्रासह गुरुवारी अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शुक्रवारी दिली आहे. 

यशवंत गौरवच्या आयान रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या अब्दुल मजीद कुरेशी (४५) यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. २० मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास मौजे धानिवबाग येथे सर्व्हे क्रमांक ११, हिस्सा नंबर १/१ मध्ये उस्मान शेख, तारीख शेख, अमन शेख, फरमान शेख व चार ते पाच आरोपींनी त्यांना हाताने, लाथाबुक्यानी, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. तसेच अमन शेख यानी पिस्तूलचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. पेल्हार पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयांतर्गत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारे आरोपीतांबाबत वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन त्यांचा शोध घेवुन गुन्हयांना पायबंद घालणेबाबत सुचना दिल्या होत्या.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी अमानउल्ला मोहम्मद तलत शेख ऊर्फ टायगर याला वाकणपाडा येथून गुरुवारी ५० हजार ५०० रुपये किंमतीचे एक पिस्तुल व एक जिवंत काडतुसासह पकडले. आरोपीला पुढील कारवाईसाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, सागर बारावकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी