शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

हत्या करून १६ वर्षे फरार आरोपीला अटक, आरपीआय नेत्याची गोळी झाडून केली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:20 IST

Nalasopara Crime News: आरपीआय नेत्याची गोळी झाडून हत्या केलेल्या गुन्ह्यात तब्बल १६ वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी गुरुवारी दिली आहे.

- मंगेश कराळे  नालासोपारा - आरपीआय नेत्याची गोळी झाडून हत्या केलेल्या गुन्ह्यात तब्बल १६ वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी गुरुवारी दिली आहे.

१९ जानेवारी २०१९ रोजी आचोळे गावातील आरपीआय युवा कार्यालयात लालचंद जैस्वाल, युवा नेता प्रवीण धुळे व इतर कार्यालयात बसले होते. त्यावेळी चारचाकी गाडीमधून आलेल्या आरोपींनी प्रवीणला कार्यालयातून बाहेर बोलावून हाताने, दगडाने, विटाने मारहाण केली होती. प्रवीणला वाचविण्यासाठी गेलेल्यानांही मारहाण झाली होती. त्यानंतर आरोपी सिकंदर शेख, अनिल सिंग या दोघांनी त्यांच्या जवळील पिस्तूलमधून प्रवीणच्या पोटावर, गळ्यावर गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी हत्या, आर्म्स ऍक्ट, अनुसूचित जाती जमाती अधिनियम कायदयानुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तात्काळ काही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. परंतू आरोपी जेपी उर्फ जयप्रकाश सिंग हा गुन्हा झाल्यापासून पोलिसांना मिळून येत नव्हता.

वरील अतिशय गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेपी उर्फ जयप्रकाशचा सर्वोतोपरी शोध घेऊन देखील तो गेल्या १६ वर्षापासून मिळून घेत नहता. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी राहुल राख यांनी सपोनि दत्तात्रय सरक, पोहवा शिवाजी पाटील, गोविद केंद्रे, हनुमंत सुर्यवंशी असे तपास पथक तयार केले. या पथकाने गुन्ह्याची व आरोपीची माहिती मिळवली. या पथकाने आरोपीच्या मूळ गावी जावून सखोल तपास व माहिती काढल्यावर नालासोपाऱ्यात मूळ पत्ता बदलून राहत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने मागील ४ महिन्यापासून सतत अहोरात्र मेहनत घेत तपास सुरू ठेवला. आरोपी एका चॉकलेट कंपनीत मार्केटिंग काम करत असल्याची माहिती मिळाली. आरोपी हा ओस्तवाल नगरी येथे येणार असल्याची माहीती मिळाली व तेथे सापळा रचला. आरोपी तेथून निघुन गेल्याने त्याचा नालासोपारा ते भाईंदर रेल्वे प्रवासात पाठलाग करुन त्याला भाईंदर रेल्वे स्टेशनच्या कॅबिन रोड येथे २० ऑगस्टला दुपारी शिताफिने ताब्यात घेतले. त्याला तपासासाठी नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल राख, धनंजय पोरे, सपोनि दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, पोउपनिरी हितेंद्र विचारे, श्रीमंत जेथे, मनोहर तावरे, आसिफ मुल्ला, पोहवा शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, हनुमंत सूर्यवंशी, संग्राम गायकवाड, राजाराम काळे, संतोष मदने, राजविर संधू, प्रविणराज पधार, महेश वेल्हे, अनिल नागरे, अखिल सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, सफौ. संतोष चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी