शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

एकाच परिवारातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू; श्रीप्रस्थाच्या नव्या रस्त्यावर बुधवारी रात्री घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:37 IST

जय अपार्टमेंटमध्ये राहणारे धीरज गोईल व हिरेन घुघल हे २० ते २५ वयोगटातील तरुण हे बुधवारी रात्री विरारवरून दुचाकीने घरी येत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क,

नालासोपारा (मंगेश कराळे) : हनुमान नगर परिसरातील जय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एकाच घरातील २० ते २५ वयोगटातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास श्रीप्रस्था येथील नव्या रस्त्यावर घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांच्या नातेवाईक व घरांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जय अपार्टमेंटमध्ये राहणारे धीरज गोईल व हिरेन घुघल हे २० ते २५ वयोगटातील तरुण हे बुधवारी रात्री विरारवरून दुचाकीने घरी येत होते. रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास श्रीप्रस्थाच्या नव्या बनविण्यात आलेल्या रस्त्यावरून येत असताना यशवंत गौरवकडून येणाऱ्या एका चार चाकी गाडीला जोरदार धडक देऊन अपघात घडला. या अपघातात नियंत्रण न झाल्याने दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

या अपघातानंतर या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून अनेकांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या रस्त्यावर गतिरोधक व सफेद पट्टे मारण्यात यावे जेणेकरून हे अपघात होणार नाही याची दक्षता मनपाने घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात