शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मोदींवर अ‍ॅक्सिडेंट मेकर पी. एम. निघावा! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:31 IST

मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत देशाने आर्थिक प्रगतीची सर्वोच्च शिखरे गाठली. त्यांच्यावर अ‍ॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट निघाला आहे .

पालघर : मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत देशाने आर्थिक प्रगतीची सर्वोच्च शिखरे गाठली. त्यांच्यावर अ‍ॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट निघाला आहे . आता पंतप्रधान मोदींनी मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा अ‍ॅक्सीडेन्ट केल्याने त्यांच्यावर अ‍ॅक्सीडेन्टमेकर प्राईम मिनिस्टर असा चित्रपट बनवला गेला पाहिजे अशी खोचक प्रतिक्रि या काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. यात मनमोहन सिंग यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत त्यांनी निषेध व्यक्त करून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.ज्यांनी आपल्या बालपणातही कधी कागदाचे साधे विमानही उडविले नाही अशा उद्योगपती अंबानींच्या एका खाजगी कंपनीला राफेल विमान खरेदीचे कोट्यवधी रु पयांचे कॉन्ट्रॅक्ट देताना संरक्षण साहित्य खरेदीत मागील ६० वर्षांचा दांडगा अनुभव असलेल्या हिंदुस्थान ऐरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला मात्र डावलण्यात आल्याची माहिती सावंत ह्यांनी दिली.ह्या व्यवहारात ४१२०५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मागच्या ४ वर्षात भाजप सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार म्हणून समोर आणले जात आहे. मात्र त्यांच्या कारकिर्दीत देशातील राजकीय संवाद अतिशय खालच्या पातळीवर गेल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसSachin sawantसचिन सावंत