शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आदिवासी भागातून ‘आखाजी’ होतेय हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:09 AM

आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे.

- हुसेन मेमनजव्हार : आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे. केवळ एकाच दिवसापूरता आखाजी साजरा केली जात असल्याने ग्रामीण भागातूनही तो हद्दपार होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.स्मार्टफोनमुळे ग्रामीण जीवन आधुनिक व सुकर झाले आहे. अक्षयतृतीय अर्थात आखाजी हा आदिवासी भागातील मोठा सण मानला जातो. पंचक्रोशीतील गावांमध्ये या सणाचे गांभीर्य काही वर्षांपासून कमी होत असून दरवर्षी ते प्रकर्षाने जाणवत आहे. सध्या परिसरात राब लावणीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांसह महिला व पुरुष मजूर दिवसभर शेतातच राबत आहेत. त्यामुळे गावे ओस पडली आहेत. एकुणच आधुनिक जिवनशैली मुळे संस्कृतीकडे दुर्लक्ष होत आहे. घराघरात अँड्रॉईड मोबाईल आल्यामुळे झोके खेळणारी मुले, मुली मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात. विविध मोबाईल कंपन्यांची इंटरनेट सेवा ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे मुला-मुलींसह महिलांनाही मोबाईलवरील विविध गेम ने वेड लावले आहे. त्यामुळे आखाजीच्या निमित्ताने गावातील गल्ल्यांमध्ये विशेषत: तरुणी व महिलांची रेलचेल दिसणे दुरापास्त झाले आहे.आंब्याचा गोडवाही महागलाआखाजीच्या गोडधोड जेवणात आंब्याचे महत्व असते. यंदा वातावरणातील बदल व अवकाळी पावसामुळे मोहोर गळाल्याने फळधारणेला उशीर झाला. त्यामुळे गुजरातसह इतर राज्यांमधून आंबा दाखल झाला आहे. सध्या आंब्याची कमीतकमी १५० रु पये किलोपासून विक्र ी सुरू असल्याने तो सर्वसामान्याना परवडेनासा झाला आहे.झाडे नसल्याने झोकेच गायब...- झाडे लावण्यासाठी व त्यांच्या संवर्धनासाठी शासन त्यांच्यापरीने प्रयत्न करीत आहे. परंतु काही वर्षांपासून चौकातली झाडेही हळूहळू नामशेष झाली आहेत. आखाजी म्हटल्यावर माहेरवाशिणी आपल्या गावी आल्यानंतर झोके खेळतात. आता गावात झाडेच नसल्याने आखाजी चा झोका कुठे बांधायचा हाही प्रश्न उद्भवत आहे. शेतात बांधलेल्या दोन चार झोक्यांखेरीज गावात सद्यस्थितीत कुठेच झोके दिसून येत नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार