शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बसचा चेसिस क्रमांक खोडून अरुणाचलचा नोंदणी क्रमांक देणाऱ्या आरटीओ एजंट सह साथीदारावर गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: December 9, 2023 01:09 IST

बसचा व्यवहार पूर्ण झाल्याने शाकीर ह्याने महाराष्ट्राचा क्रमांक असलेली आयशर मिनी बस खान ह्याच्या ताब्यात दिली.

मीरारोड ( ठाणे )  - जुनी बस स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून बसचा चेसिस क्रमांक खोडून अरुणाचल प्रदेशच्या परिवहनचा नोंदणी क्रमांक देणाऱ्या आरटीओ एजंट सह ट्रॅव्हल एजंटवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नालासोपाराच्या उमराळे भागात राहणार फिर्यादी वाहन चालक एजाज अल्ताफ खान ( ३२ ) यांना मीरारोडच्या शिवार उद्यान येथील सहारा इंडिया टूर्स ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात शाकीर हुसेन याने जुनी बस खरेदी साठी ६ लाख २५ हजार व कागदपत्र बनवण्यासाठी अडीच लाख खर्च सांगितला. स्वस्तात बस मिळते म्हणून खान याने बसची सर्व रक्कम शाकीर ह्यास दिली. तसेच बस च्या कागदपत्रांसाठी शाकीर याच्या सांगण्या वरून आरटीओ एजंट रमेश सरोदे ह्याला २ लाख मित्राच्या गुगल पे खात्यावरून पाठवले. 

बसचा व्यवहार पूर्ण झाल्याने शाकीर ह्याने महाराष्ट्राचा क्रमांक असलेली आयशर मिनी बस खान ह्याच्या ताब्यात दिली. एजंट सरोदे ह्याने गणेश नावाच्या इसमास पाठवून बसच्या चेसिस क्रमांकावर खाडाखोड करत खान यांना महाराष्ट्राच्या परिवहन विभागाचा नोंदणी क्रमांक न देता थेट अरुणाचल प्रदेशच्या परिवहन कार्यालयाचा नोंदणी क्रमांक दिला. 

बाहेरच्या राज्यातील वाहनांची महाराष्ट्रात तपासणी होत असल्याने खान ह्याने घाबरून अरुणाचल प्रदेशचा क्रमांक न लावता महाराष्ट्राचा बनावट क्रमांक बस ला लावला. दरम्यान चोरीच्या वाहनांना अन्य राज्यातील स्क्रॅप वाहनांचे क्रमांक वापरून फसवणूक करणाऱ्या टोळीला उघडकीस आणल्या नंतर त्याचा अधिक तपास करणाऱ्या मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ च्या पोलिसांनी खान यांच्या बसची तपासणी करून ती जप्त केली. 

शाकीर हुसेन व एजंट रमेश सरोदे यांनी  ८ लाख २५ हजार घेऊन बसची कागदपत्रे बनवून न देता मूळ चेसीसी क्रमांक खोडून अरुणाचल प्रदेशच्या परिवहन चा क्रमांक लावण्यास सांगून फसवणूक केल्याने खान यांच्या फिर्यादी वरून मीरारोड पोलीस ठाण्यात ६ डिसेम्बर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कैलास टोकले व पथक तपास करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस