वाहन तळाच्या जागेत बांधलेली ९ दुकाने तोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 06:19 PM2021-12-09T18:19:48+5:302021-12-09T18:20:01+5:30

मीरारोडच्या राम नगर येथील पोलीस आयुक्तालयाच्या बाजूला असलेल्या इमारत क्र. ९ विकासक राम नगर डेव्हलपर्स यांनी विकसित केली आहे.

9 shops built in the basement of the vehicle were demolished | वाहन तळाच्या जागेत बांधलेली ९ दुकाने तोडली 

वाहन तळाच्या जागेत बांधलेली ९ दुकाने तोडली 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरारोडच्या राम नगर भागात बड्या विकासकाने वाहनतळाच्या जागेत बांधलेल्या ९ दुकानांवर महापालिकेने तोडक कारवाई केली . यामुळे वाहनतळांच्या जागा रहिवाश्यांच्या हक्काच्या असताना त्यात बेकायदा दुकाने वा सदनिका बांधून विक्री करण्याचे प्रकार पुन्हा ऐरणीवर आले आहेत . 

मीरारोडच्या राम नगर येथील पोलीस आयुक्तालयाच्या बाजूला असलेल्या इमारत क्र . ९ विकासक राम नगर डेव्हलपर्स यांनी विकसित केली आहे . इमारतीच्या तळमजल्यावर वाहनतळा साठी असलेले स्टील्ट खुले ठेवण्या ऐवजी ते बंदिस्त करून सुमारे १७०० चौ. फु . इतके बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले होते . 

स्टील्ट मध्ये ९ दुकाने व एक मीटर खोली बांधली असल्याने महापालिकेने अधिकारी - कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचा मोठा फौजफाटा घेऊन २ जेसीबीच्या सहाय्याने सदर दुकानांची बांधकामे तोडली .  या आधी देखील विकासकास पालिकेने लेखी पत्र दिली होती तसेच एमआरटीपी खाली कारवाई केली होती . 

बांधकाम नकाशे मंजूर करताना त्यात स्टील्ट असेल तर ते मोकळेच ठेवणे बंधनकारक आहे . कारण स्टील्ट हे वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ म्हणून सदनिका खरेदीदार रहिवाश्यांसाठी असते . परंतु अनेक विकासक हे स्टील्ट पार्किंग मध्ये गाळे वा सदनिका बांधून सर्रास त्याची बेकायदेशीर विक्री करून बक्कळ पैसा कमावतात . 

विशेष म्हणजे महापालिका , लोकप्रतिनिधी आदीं कडून अश्या स्टील्ट पार्किंग मधील अनधिकृत बांधकामां कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे नेहमीचे आहे . आधीच इमारतीं मध्ये वाहने उभी करण्यास जागा कमी असताना स्टील्ट मध्ये बेकायदा बांधकामे केल्याने वाहनतळांचा प्रश्न आणखी गंभीर बनत चालला आहे .

Web Title: 9 shops built in the basement of the vehicle were demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.