शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

भाईंदर फाटक जवळील गुटखा विक्री करणाऱ्या ९ पानटपरी चालकांना अटक 

By धीरज परब | Updated: December 9, 2023 23:17 IST

मीरा भाईंदर शहरात सर्रास पान टपऱ्या हे प्रतिबंधित गुटखा विक्रीची केंद्र बनली आहेत.

मीरारोड - अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाई केवळ भाईंदर फाटक परिसरातील तब्बल ९ पान टपऱ्यां मधून गुटखा विक्री होत असल्याचे आढळून आले असून त्या सर्व  ९ पान टपरी चालकांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे.  

मीरा भाईंदर शहरात सर्रास पान टपऱ्या हे प्रतिबंधित गुटखा विक्रीची केंद्र बनली आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत पवार, माणिक जाधव व भरत वसावे ह्या तिघांनी वरिष्ठांच्या आदेशा नुसार नवघर पोलिस ठाण्यातील जे जे मुल्ला व किरण नेरपगार यांच्यासह मिळून भाईंदर पूर्वेच्या फाटक मार्गवरच्या पानशॉप वर गुरुवारी धडक कारवाई केली. फाटक लगतच्या परिसरातील ९ पान टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा सर्रास विकला जात असल्याचे आढळले असून तेथून १० हजारांचा गुटखा साठा जप्त केला आहे. 

साईबाबा मंदिर जवळच्या ओमसाईधाम पान भांडारचा चालक सत्यनारायण तिलकधारी गुप्ता ( ५५ ) रा. अलकापुरी, नालासोपारा  ; शिवरुद्र अपार्टमेंट  मधील संजय पान शॉपचा संजय रामधनी गौड (४० ) ; टारझन बारच्या बाजूला विश्वकर्मा पान शॉप चा विजयकुमार रामखिलावन विश्वकर्मा ( ४३ ) ; अंजली बिल्डिंग मधील पारसनाथ भोजनालय पानशॉपचा भागवत जल्लू विश्वकर्मा ( ३६ ) रा. कृष्णधाम, साईबाबा रुग्णालय जवळ ; कस्तुरी बस स्टॉप जवळ  मंजय पान शॉपचा संजय रामधनी  गौड ( ३७ ) व बाबा पानशॉपचा अनिलकुमार रामधनी गौड ( ३७ ) दोघेही रा. शिवरुद्र अपार्टमेंट ; पांचाळ इस्टेट मधील मनोज पानशॉपचा मनोज शमानंद जयस्वाल ( ४६ ) रा. नर्मदा अभिषेक, नर्मदा नगर ; ज्योती बारच्या बाजूला जितू पानशॉपचा चालक जितबहाद्दर शिवभजन गुप्ता (३१ )  रा. संतोष भुवन, नालासोपारा व कस्तुरी बस स्टॉप मागे  प्रवीणकुमार पानशॉप चा प्रवीणकुमार हिरालाल प्रजापती ( ४६ ) ह्या ९ जणांच्या पान दुकानावर धाडी टाकून ह्या सर्वाना अटक केली आहे. त्यांच्या पानशॉप मधून गुटखा साठा जप्त करण्यात आला. 

सदर पान टपरी चालकांनी त्यांना बबलू खान हा इसम गुटखा पुरवत असल्याची माहिती दिली. प्रशांत पवार यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ९ पानटपरी चालक व गुटखा पुरवणारा बबलू खान अश्या १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस