शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

वसई-विरारमध्ये कोरोनाचे 7 नवे रुग्ण; एकूण संख्या झाली 110

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 08:33 IST

वृत्तवाहिनी संपादक,वृत्तपत्र कर्मचारी ,मुंबई मनपा कर्मचारी व शाळा व्यस्थापका सहित एक गृहिणी झाली कोरोना पॉझिटिव्ह !

ठळक मुद्देनालासोपाऱ्यात 88 वर्षीय वृद्ध रुग्णाचा कोरोनाने मृत्यू !

आशिष राणे

वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी कोरोना विषाणूने बाधित 7 नव्या पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद झाली असून यामध्ये 2 महिला व 5 पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तर यातील एका 88 वर्षीय कोरोनाची लागण झालेल्या जेष्ठ नागरिकाचा नालासोपारा पश्चिमेतील खाजगी रुग्णालयात उपचारावेळीच शनिवारी मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेने दिली. शनिवारी वसई- विरार आणि नालासोपारा शहरात 7 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने आता वसई-विरार महापालिका हद्दीतील एकूण कोरोनाने बाधित रुग्ण संख्या 110 वर गेली असून या 7 पैकी नालासोपारात वास्तव्य करणाऱ्या 88 वर्षीय जेष्ठ नागरिकांचा शनिवारी संध्यकाळी रुग्णालयातच मृत्यू झाल्याने आता वसई विरार महापालिका हद्दीतील हा 8 वा बळी असल्याची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे शनिवारी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णामध्ये 2 रुग्ण वृत्तपत्र कार्यालयातील कमर्चारी,1 रुग्ण वृत्तवाहिनीचा संपादक असून 1 रुग्ण शाळेचा व्यवस्थापक आहे तसेच 1 रुग्ण मुंबई मनपाचा कर्मचारी असून त्याच्या संपर्कामुळे त्याच्या गृहिणी पत्नीला देखील कोरोनाची बाधा झाली आहे.  पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,शनिवारी आढळून आलेल्या वसई पश्चिमेकडील 38 वर्षीय महिला हि मुंबईत वृत्तपत्र कार्यालयातील कर्मचारी असून सततच्या मुंबई प्रवास असल्याने अखेर ती पॉझिटिव्ह आढळून आली तिला मनपाच्या वसई पूर्वेतील आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवले आहे.तर वसई पश्चिमेतील 29 वर्षीय महिला मुंबई पालिका कर्मचारी असलेल्या आपल्या पतीच्या संपर्कात आल्याने ती सुद्धा हायरिस्क कॉन्टेक मधील असल्याने तिला मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्यातच विरार पूर्वेकडील हा रुग्ण मुंबई येथील वृत्तपत्रात कर्मचारी असून त्यास मुंबईत उपचार सुरु आहेत.तर विशेष म्हणजे याच विरार पूर्वेतील 45 वर्षीय रुग्ण हा वृत्तवाहिनीचा संपादक असून त्यास उपचारासाठी दाखल केले आहे.तसेच ३१ वर्षीय रुग्ण हा मुंबई मनपाचा कर्मचारी असून त्याच्यावर देखील मुंबईत उपचार सुरु आहेत आणि याच मुंबईत 28 वर्षीय रुग्ण एक शाळेचा व्यवस्थापक म्हणून आहे त्यास मात्र नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे नालासोपारा पूवेर्तील 88 वर्षीय जेष्ठ रुग्णास तीव्र श्वसन व इतर आजार असल्याने त्यांना चार दिवसापूर्वी नालासोपाराच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले मात्र शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली व त्यांचा मृत्यू झाला.          एकूणच शनिवारी संध्याकाळ पर्यँत ही एकूण संख्या 110 वर पोहचली यामध्ये आजवर वसई विरार शहरात 34 जण कोरोना मुक्त झाले असून कोरोना आजाराने 8  रुग्णाचा मृत्यू झाला.तर अजूनही 68  रूग्ण वसई नालासोपारा व मुंबईच्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेततरी मात्र वसई विरार ची वाटचाल शनिवारी शंभरी पार करून 110  झाली असल्याने पालिकेच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

दिलासा दायक ; दोघे भावंड कोरोना मुक्त !विरार पूर्वेतील दोन्ही भावंडं मधल्या  काळात कोरोना बाधित होऊन त्यांची तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले होते या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते यातील एक रुग्ण हा मुंबई एअरपोर्ट कर्मचारी असून दुसरा रुग्ण नायर रुग्णालयाचा कर्मचारी आहे.या दोघांनी म्हणजेच दोन्ही भावंडानी कोरोना सारख्या जीवघेण्या आजारावर मात केली आणि त्यांचे कोविड अहवाल देखील निगेटिव्ह आले होते अखेर उपचार पूर्ण झाल्यावर या दोघाना त्यांच्या विरार पूर्वेतील घरी सोडण्यात आले तिथे त्यांचे परिसरातील व संकुलातील नागरिकांनी टाळया वाजवून स्वागत केले.    

दि.25 एप्रिल 2020 शनिवार ची कोरोना- रुग्णांची आकडेवारी

वसई -1 पुरुष व  2 महिला, नालासोपारा - 2  पुरुषआणि विरार -2 पुरुषएकूण रुग्ण संख्या  - 7  मयत -नालासोपारा  -1  वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या - 110  कोरोना मुक्त संख्या :- 34  कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 8उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :- 68

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस