शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुळींजमध्ये ७ सराईत गुन्हेगार १ व २ वर्षासाठी तडीपार, तुळींज पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:11 IST

तडीपारीची कारवाई सुरू झाल्याने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा : तुळींज पोलिसांनी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या ७ सराईत गुन्हेगारांना बुधवारी १ व २ वर्षासाठी तडीपार केले आहे. या ७ गुन्हेगारांमध्ये एका महिलेचाही सहभाग आहे. तडीपारीची कारवाई सुरू झाल्याने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे.

तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता तुळींज पोलिसांनी कंबर कसली आहे. या सराईत आरोपींवर कायद्याचा जरब व धाक निर्माण होण्यासाठी आणि भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार अथवा समाजविघातक घटना टाळण्यासाठी परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्तांकडून तुळींज पोलीस ठाण्यात वास्तव्यात असलेले व गुन्ह्यात सक्रिय, उपद्रवी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई सुरू केली आहे. आगामी असलेल्या सणावारांच्या काळात कोणतीही अप्रिय घटना न घडण्यासाठी पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी गुन्हेगारांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. 

आमिर अन्सारी उर्फ पठाण (२३), नरेंद्र शर्मा (२५), गायत्री तिवारी, रिझवान खान (२९) या चौघांना २ वर्षासाठी तर इस्लाम शेख (४४), राजेशकुमार पांडे (४६) आणि समरजित विश्वकर्मा (५६) या तिघांना १ वर्षासाठी जवळच्या पाच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तुळींज या पोलिस ठाण्यांवर उपायुक्तांनी लक्ष केंद्रित केले असून, समाजाला त्रासदायक ठरणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार, दत्तात्रय पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय पाटील, पोलीस हवालदार अनिल शिंदे, अशोक तांडेल, आकाश वाघ यांनी केली आहे.

वाढती गुन्हेगारी बघता पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी ४ आरोपींना २ तर ३ आरोपींना १ वर्षासाठी ५ जिल्ह्यांतून बुधवारी तडीपार केले आहे.शैलेंद्र नगरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार