शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पालघर नगरपरिषदेसाठी ६७.५७% मतदान; आज मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 01:31 IST

लोकसभेआधीचा ‘सराव’ म्हणून पाहिल्या गेलेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी ६७.५७ टक्के मतदान झाले. दुपारच्या सत्रात कडाक्याच्या उन्हामुळे मतदारांनी पाठ फिरविल्याने मतदान केंद्रात शुकशुकाट होता.

पालघर : लोकसभेआधीचा ‘सराव’ म्हणून पाहिल्या गेलेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी ६७.५७ टक्के मतदान झाले. दुपारच्या सत्रात कडाक्याच्या उन्हामुळे मतदारांनी पाठ फिरविल्याने मतदान केंद्रात शुकशुकाट होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदान केंद्रावर एकच झुंबड उडाली होती.दरम्यान, वेऊर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सायं. ६.४५ वाजेपर्यंत मतदान सुरू ठेवण्यात आले होते, असा आरोप करीत एका अपक्ष उमेदवाराने मतदान केंद्रावर गोंधळ घातला. एका राजकीय पक्षाला मदत करण्याच्या हेतूने निवडणूक अधिकाऱ्यांनी हे केंद्र सुरू ठेवल्याचे त्याचे म्हणणे होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत, त्याला ताब्यात घेत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर, सहायक निवडणूक अधिकारी महेश सागर, प्रशांत ठोंबरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.हा प्रकार गैरसमजुतीतून घडला आहे. इतरत्र निवडणूक शांततेत पार पडल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.महिला उमेदवारांत बाचाबाचीपालघरची नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पडली, असे जरी निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे असले, तरी महिला उमेदवारांत झालेली बाचाबाची चर्चेचा विषय ठरली. येथील टिष्ट्वंकल स्टार शाळेतील मतदान केंद्राबाहेर दोन महिला उमेदवारांमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर बाचाबाचीमध्ये झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, शिवाय एसटी आगार, आनंद आश्रम शाळा या केंद्रांवर काही प्रभागात बोगस मतदारांच्या तक्र ारीही आल्या.

टॅग्स :palgharपालघर