शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

वसतिगृहापासून ६६६ बालके वंचित, पालघर जिल्ह्यातील भीषण वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:18 IST

ठाणे येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयाच्या उदासीन व भोंगळ काराभारामुळे डहाणू एकात्मिक

डहाणू : ठाणे येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयाच्या उदासीन व भोंगळ काराभारामुळे डहाणू एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गत येणा-या डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील एकूण ६६६ आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थीनी शासकीय निवासी वसतीगृह प्रवेशापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे ते शालाबाह्य विद्यार्थी होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत येथील आदिवासी पालकांत संताप व्यक्त केला जात आहे.हे विद्यार्थी दिवाळीनंतर शिक्षण अर्धवट सोडून आई वडीलांसोबत रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान विद्यमान वसतीगृहात अद्याप २५० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल अशी शिफारस डहाणू प्रकल्प कार्यालयाने अप्पर आयुक्त ठाणे यांना करूनही गेल्या दोन महिन्यापासून त्या प्रस्तावाला मंजूरी मिळत नसल्याने दुर्गम भागांत राहून शहरी भागांत येवून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाºया आदिवासी विद्यार्थ्यांवर दररोज चाळीस ते पन्नास कि.मी.चा प्रवास करून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.डहाणू तालुक्यात एका बाजूला इयत्ता आठवीतून पास झालेल्या एक हजार विद्यार्थ्यांना नववीत प्रवेश मिळत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना प्रवेशासाठी वणवण भटकण्याची वेळ आली होती. यावेळी लोकमतने या बाबतीत आवाज उठविल्याने खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने धावपळ केल्याने हजारो विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्ग सुकर झाला असतांनाच गेल्या पंधरा ते वीस वर्षात पालघर जिल्हयातील डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील आदिवासी मुले, मुलींसाठी असलेल्या शासकीय निवासी वसतीगृहाची एकही नवीन इमारत न झाल्याने शिवाय विद्यमान वसतीगृहाची क्षमता व संख्या न वाढविल्याने यावर्षी एकूण ६६६ अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. परिणामी हे विद्यार्थी दिपावलीनंतर बालमजूर होण्याची शक्यता आहे.डहाणू प्रकल्पांतर्गत येणाºया डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यात दरवर्षी पास होणाºया आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने जिल्हा भरातील शाळा, महाविद्यालय, निवासी वसतीगृह, तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची क्षमता कमी पडू लागल्याने गोर, गरीब, निरक्षर आदिवासी पालकांना आपल्या मुला मुलींच्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. शाळा, महाविद्यालये सुरू होऊन चार, साडेचार महिने झाले तरी अद्याप त्यांना वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही. नसल्याने दुर्गम भागांतून शिक्षणासाठी शहरी भागांत येण्या जाण्यासाठी रोजच्या रोज पन्नास, साठ रूपये आणायचे कुठून असा प्रश्न पडला असून ते हताश झाले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारGovernmentसरकार