शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

विरार ते नायगाव दरम्यान ६ फ्लायओव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:26 IST

प्रवासाचे अंतर होणार कमी; वाहतूक कोंडीपासून नागरिकांची होणार मुक्तता

नालासोपारा : वसई विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, येणाºया वर्षांमध्ये महानगरपालिका विरार ते नायगाव या अंतरात सहा नवीन फ्लायओव्हर बांधणार आहेत. या पुलांच्या बाबतीत महानगरपालिकेने एमएमआरडीएला प्रस्ताव पाठवला आहे. या पुलांच्या निर्मितीसाठी साडे तीनशे कोंटींचा खर्च येणार आहे. या फ्लायओव्हरमुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे येण्या-जाण्यासाठी प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याने वेळेची बचत होणार असून भविष्यात वाहतूक कोंडीपासूनही सुटका होणार आहे.वसई विरार मधील जनतेच्या सोयीसुविधांच्या मागणीवरून विरार ते नायगाव या शहरा दरम्यान सहा नवीन फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावात विरार ते कोपरी, नारंगी, विराट नगर, नालासोपारा येथील ओस्तवाल नगरी, अलकापुरी, वसईच्या उमेळमान येथील पूर्व ते पश्चिम असे सहा नवीन पूल बांधणार आहे. नायगाव येथे एका पुलाचे काम अर्ध्याच्या वर झालेले असून लवकरच तो वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे नायगाव परिसरात राहणाºया नागरिकांचा फायदा होणार आहे. भविष्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील विरार, नालासोपारा आणि वसई याठिकाणी तीन फ्लायओव्हर आहेत. विरारच्या पुलावर अवजड वाहनांना वाहतुकीस निर्बंध असल्याने नारंगी फाटा येथील रेल्वे फाटकावरून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वाहनांना येजा करावी लागते. नालासोपारा येथील पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. संध्याकाळच्या सुमारास अवजड वाहनांच्या येण्याजाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी दररोज होत असून जनतेची व वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तर वसई येथील पूर्व आणि पश्चिम प्रभाग जोडणारा जुना पंचवटी पूल धोकादायक झाल्याने बंद करण्यात आला असून नवीन पुलावर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूककोंडी होत असते.या ठिकाणी मिळणार सुविधा.....नवीन पुलांची निर्मिती झाल्यावर वसई विरारमधील जनतेला अनेक सोयी सुविधा मिळणार आहेत. पूर्वेकडील प्रभागातून पश्चिमेकडील प्रभागात येणाºया जाणाºया नागरिकांचे प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याने वेळेची बचत होणार असून येण्याजाण्यासाठी लागणाºया गाडी भाड्यातही कपात होणार आहे.अनेक ठिकाणे रेल्वे स्थानकांच्या समोरासमोर आहेत. पण दुरून वळसा घालून त्याठिकाणी जावे लागते. पण आता हे ही अंतर कमी होणार आहे. विरार, नालासोपारा आणि वसई पश्चिमेकडील शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मॉल, थिएटर, समुद्रे किनारी येण्याजाण्यासाठी नागरिकांना लांबचा वळसा घेऊन प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे वाहतुककोंडीच्या समस्येपासून सुटका होणार !प्रस्तावित पुलांच्या ठिकाणी अतिक्र मण....ज्या ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली जाणार आहे. त्यांच्या उभारणीत अनेक अडचणी सुद्धा आहे. भविष्यात उभ्या राहणाºया पुलांच्या जागेत अतिक्र मणे झाली असून काहींनी कब्जा केल्याचेही दिसून येत आहे. हे अतिक्र मण हटविण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्तावित खर्चाच्या रकमेत वाढ होणार आहे. यामुळे काही ठिकाणी विरोधही केला जाईल ही गोष्ट नाकारता येत नाही.प्रवास होणार सुकर,नायगाव आणि वसई पश्चिमेकडे येण्यासाठी महामार्गावरून सातीवली, रेंजनाका, पंचवटी पूलावरून वसई, नायगाव येथे यावे लागते. नायगाव पूर्वपश्चिम जोडणारा पूल साकारला तर अंदाजे २५ किलोमीटरचे अंतर कमी होणार तर लोकांना नायगाव पूर्वेकडून नायगाव आणि वसई पश्चिमेकडे जाण्यासाठी लागणाºया वेळेची बचत होऊन इंधन देखील वाचणार आहे. या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असून लोकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. वसई पश्चिमेकडील न्यायालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, प्रांताधिकारी कार्यालय, आरटीओ, टीएलआर कार्यालयात येणाºया जाणाऱ्यांच्या वेळ व इंधनाची बचत होईल, तसेच वाहतूककोंडीची समस्याही सुटेल.वसई विरार मधील जनतेच्या मागणीवरून विरार ते नायगाव या शहरात सहा नवीन फ्लायओव्हर बांधण्याचा निर्णय घेतला असून एमएमआरडीएला प्रस्ताव पाठवला आहे. पुलांच्या निर्मितीसाठी साडे तीनशे कोटींचा खर्च लागणार आहे.- राजेंद्र लाड (मुख्य कार्यकारी अभियंता, वसई विरार शहर महानगरपालिका)

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक