शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

पालघरमध्ये ५०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणात शिळी भाजी दिल्याचा संशय; ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 09:39 IST

यापैकी ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, काही विद्यार्थी अत्यवस्थ आहेत.

पालघर : डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एकूण 33 आश्रमशाळांमध्ये बोईसर कांबळ गाव येथील मध्यवर्ती किचनमधून अन्नपुरवठा केला जातो. या किचनमधून पुरवण्यात आलेले अन्न खाल्ल्याने एकूण 39 आश्रमशाळांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी घडली, या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. यापैकी ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, काही विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. या विद्यार्थ्यांना आदल्या दिवशीची भाजी पुन्हा दुसऱ्या दिवशी जेवणात दिल्याने हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

चवळीची भाजी खाल्ल्यानंतर जुलाब• डहाणू, पालघर, तलासरी आणि वसई या तालुक्यांत ३३ आश्रमशाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये कांबळ गाव येथील सेंट्रल किचनमधून दररोज सकाळचा नाश्ता, दोनवेळचे जेवण पुरवले जाते.• या सर्व विद्यार्थ्यांना सोमवारी सकाळी चवळीची भाजी आणि एक अंडे, तर संध्याकाळी दुधी आणि डाळीची भाजी जेवणात दिली.• त्यानंतर मंगळवारी सकाळी जेवण देताना पुन्हा चवळीची भाजी आणि एक अंडे दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. काही वेळेतच त्यांना उलट्या, जुलाब होण्यास सुरुवात झाली.• त्यामुळे सोमवारची चवळीची भाजी पुन्हा मंगळवारी विद्यार्थ्यांना दिली तर नाही ना? की ज्यामुळे मुलांना उलट्या झाल्या, असा प्रश्न आदिवासी संघटनेचे डॉ. सुनील पहाड यांनी उपस्थित केला आहे.

या आश्रमशाळांतील विद्यार्थी रुग्णालयांत रनकोळ आश्रमशाळेतील ९४, मसाड आश्रमशाळेतील ३, तवा येथील ६, महालक्ष्मी येथील २, खंबाळे येथील ३०, आंबेसरी येथील ४७, अस्वली येथील ३. कासपाडा येथील ४२. कळमदेवी येथील ३०, भाताने येथील ८, खुटल येथील १७, नानिवली येथील ६, बेटेगाव येथील ६, कांबळगावातील ५, नंडॉरेतील ६०, गोवाडेतील २८, सावरेतील १२, टेकाळेतील २०, टाकव्हालेतील ४ आणि लालठाणेतील ८ विद्यार्थी अशा सुमारे ५०० विद्यार्थ्यांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील ३३२ विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्यात आल्यानंतर त्यांच्यावरील धोका आता टळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले,

जिल्हाधिकारी बोडके, विवेक पंडित यांनी केली सेंट्रल किचनची पाहणी ज्या सेंट्रल किचनमधून तयार जेवण पुरवण्यात येते. त्या किचनला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि राज्यस्तरीय आदिवासी विकास विभागाच्या आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी भेट देऊन पाहणी केली. आश्रमशाळांमधील १५ हजार विद्यार्थ्यांना नाश्ता आणि दोन वेळचे तयार जेवण २१ बंदिस्त वाहनांमधून आश्रमशाळांमध्ये पोहोचवले जाते. वर्षभरापूर्वी टाटा ट्रस्टमार्फत 'ना नफा, ना तोटा तत्त्वावर सेंट्रल किचन चालवण्यात येत होते. यंदाच्या वर्षापासून आदिवासी प्रकल्प विभागार्फत सेंट्रल किचन चालवले जाते. किचनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि रक्ताचे नमुने घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरु आहे. दरम्यान, आमदार विनोद निकोले यांनी तलासरीत विर्थ्यांची विचारपूस केली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडे, डॉ. तन्वीर शेख यांनी सेंट्रल किचनची पाहणी केली.

सुमारे ५०० विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यातील ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. अन्नाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.- गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर

सेंट्रल किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव, जेवणाबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे त्याचे ऑडिट करून हा ठेका रद्द करण्याबाबत आदिवासी विकासमंत्रीविजयकुमार गावित यांच्याकडे तक्रार केली आहे.- राजेंद्र गावित, माजी खासदार 

टॅग्स :palgharपालघरStudentविद्यार्थीfood poisoningअन्नातून विषबाधा