शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वादातून मुलाने केले आईवडिलांवर ३५ वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 05:23 IST

आर्थिक वादाचे पर्यावसन; स्क्रू ड्रायव्हर, सुरा, चाकू व हातोड्याचा वापर

नालासोपारा : मुलाने पैशांच्या कारणावरून झालेल्या भांडणातून आपल्या आईवडिलांवर ३५ वार केल्याची घटना सोमवारी पहाटे नालासोपाऱ्यात घडली. जखमी आईवडीलांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नालासोपारा पश्चिमेकडील इम्पिरिअल टॉवरच्या सी विंग २०२ मध्ये नरेंद्र पवार पत्नी नर्मदा आणि मुलगा जन्मेशसोबत राहतात. जन्मेश (२०) हा शेवटच्या वर्षाला असून, शेअर मार्केटमध्ये पार्ट टाइम नोकरी करतो. त्याचे सोमवारी रात्री आईवडिलांसोबत पैशांवरून भांडण झाले होते. पहाटे पावणे चारच्या सुमारास जन्मेशने झोपलेल्या वडील नरेंद्र (५५) आणि आई नर्मदा (५०) यांच्यावर स्क्रू ड्रायव्हर, सुरा, एक चाकू आणि हातोड्याच्या साहाय्याने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात आई-वडिलांना टाकून त्याने पहाटे कपडे बदलून पळ काढला.इमारतीमधील लोकांनी नालासोपारा पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी आईवडिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये पाठविले. मात्र, नंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.दोन्ही जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आरोपी जन्मेश हा कपडे बदलून बॅग घेऊन आणि तोंडाला हेल्मेट लावून पहाटे साडे चारच्या सुमारास पळून गेल्याचे इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या हल्ल्यामागे नेमके काय कारण आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.- राजू नरवडे, सहायक पोलीस निरीक्षक (नालासोपारा पो. स्टेशन)

टॅग्स :Murderखून