शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

२४ वर्षे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:03 IST

Nalasopara Crime News: रिक्षा भाडे नाकारण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून चाकूने वार करून २४ वर्षे फरार असलेल्या मुख्य आरोपीला तलासरी येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाले आहे.

- मंगेश कराळेनालासोपारा - रिक्षा भाडे नाकारण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून चाकूने वार करून २४ वर्षे फरार असलेल्या मुख्य आरोपीला तलासरी येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाले आहे. आरोपीला पुढील तपास व चौकशीसाठी विरार पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी शिवकुमार गायकवाड यांनी बुधवारी दिली आहे.

१४ ऑक्टोबर २००१ साली संध्याकाळच्या सुमारास आगाशीकडे जाणाऱ्या रोडलगत डॉ. कोळी यांच्या दवाखान्याच्या समोर अर्नाळा येथील शांतीनगर येथे राहणारे मोहरम अली (५६) यांच्या पोटात आरोपीने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये भर्ती केल्यावर त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोउनि एम.जी. खैरनार यांनी तपास करून फरार आरोपी हारून अली सय्यद यांच्याविरोधात सीआरपीसी २९९ प्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी जुन्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मागील ५ महिन्यापासून अथक परिश्रम करुन या गुन्ह्यातील मयताचे नातेवाईक व इतर साक्षीदारांकडे फरार आरोपीबाबत सखोल चौकशी करत होते. आरोपीच्या यूपीच्या मुळ गावी व मुंबई परिसरात बातमीदार व तांत्रिक विश्लेषनाद्वारे शोध घेऊन मुख्य फरार आरोपी हारुन अली सय्यद (४३) याला तलासरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर आरोपी हा त्यावेळी रिक्षा चालवायचा. त्याचे मोहरम अली सोबत रिक्षा भाडे नाकारण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्यातून आरोपीने रागाच्या भरात त्याच्या पोटात चाकूने वार केल्याचे सांगितले. अशा प्रकारे २४ वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केले.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, पोहवा मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, राकेश पवार, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, मसुब प्रविण वानखेडे, सागर सोनवणे आणि लखनऊ एसटीएफचे पोलीस निरीक्षक दिलीप तिवारी यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार