शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पालघरात २२ हजार किलो डाळी जप्त

By admin | Updated: October 23, 2015 00:10 IST

पालघरमधील विमल माणिकलाल जैन (४१) या व्यापाऱ्याकडे जीवनावश्यक वस्तू साठविण्याचा कुठलाही परवाना नसताना त्यांनी गोदामात बेकायदेशीररीत्या तूरडाळ

पालघर : पालघरमधील विमल माणिकलाल जैन (४१) या व्यापाऱ्याकडे जीवनावश्यक वस्तू साठविण्याचा कुठलाही परवाना नसताना त्यांनी गोदामात बेकायदेशीररीत्या तूरडाळ, मसूर इ. २२ हजार ७०० किलो (२२७ क्लिंटल) ची साठवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्यात तूरडाळीसह अन्य अन्नधान्यांची व्यापाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्रिम साठवणूक केल्याने तूरडाळीसह इतर कडधान्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. ही कृत्रिम भाववाढ करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. बुधवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पालघर-मनोर रोडवरील मेसर्स कांतिलाल माणिकलाल अ‍ॅण्ड कंपनीचे मालक विमल जैन यांनी त्यांच्या दुकानात बेकायदेशीररीत्या अन्नधान्यांची साठवणूक केल्याची माहिती जिल्हापुरवठा अधिकारी उमेश बिरारी, तहसीलदार चंद्रसेन पवार आणि पुरवठा अधिकारी संभाजी पावरा यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या दुकानामागील गोदामात धाड टाकली. त्यांच्या गोदामात ५२.८५ क्विंटल तूरडाळ, ४३.५० क्विंटल मूगडाळ, ४१५.४५ क्विंटल तांदूळ, ४.८० क्विंटल उडीदडाळ, ८.४० क्विंटल मसूरडाळ, ४.२० क्विंटल चवळी, २.१० क्विंटल मठ, २५.२० क्विंटल चणे, १२.५० क्विंटल वाल, २०.७० क्विंटल चणाडाळ असे २२ हजार ७०० किलो (२२७ क्विंटल) असा ३६ लाख २९ हजार ४७५ रु.चा माल सापडला. या जीवनावश्यक वस्तू बेकायदेशीररीत्या साठवल्याचे तसेच त्यासंबंधित कुठलाही परवाना दुकानमालकाकडे नसल्याचे पुरवठा अधिकारी पावरा यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याविरोधात जीवनावश्यक अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३, ७ प्रमाणे पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून गोदाम सील करण्यात आले आहे. (वार्ताहर)जीवनावश्यक वस्तूंची साठमारी करून कृत्रिम भाववाढ करीत सर्वसामान्य ग्राहकांची लुबाडणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली असून धडक कारवाई करण्यात येणार आहे.- चंद्रसेन पवार, तहसीलदार, पालघर