शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मनसे उपप्रमुखासह २० जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:39 IST

वसई पश्चिमेकडील कोलार गिरीज गावातील ८१ वर्षीय वयोवृद्ध महिलेला ठोशा बुक्यांनी मारहाण करून तिच्या मुलाला व सुनेला जीवे ठार मारण्याची धमकी देत घराचे मुख्य दरवाजा जेसीबीने पाडून लोखंडी ग्रील, झाडे तोडून विटा, दगड आणि इतर सामान चोरी करून नेल्याची घटना ८ जूनला घडली आहे.

नालासोपारा : वसई पश्चिमेकडील कोलार गिरीज गावातील ८१ वर्षीय वयोवृद्ध महिलेला ठोशा बुक्यांनी मारहाण करून तिच्या मुलाला व सुनेला जीवे ठार मारण्याची धमकी देत घराचे मुख्य दरवाजा जेसीबीने पाडून लोखंडी ग्रील, झाडे तोडून विटा, दगड आणि इतर सामान चोरी करून नेल्याची घटना ८ जूनला घडली आहे.वयोवृद्ध महिलेच्या तक्र ारीवरून वसई पोलिसांनी मनसे वसई तालुका उपप्रमुखासह वीस जणांवर दरोडा, धमकी, शिवीगाळ या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. वसई पश्चिमेकडील कोलार गिरीज गावातील लेभाटवाडी येथे राहणाऱ्या इस्तलीन (स्टेला) पीटर डिसिल्व्हा (८१) या वयोवृद्ध महिलेला ८ जूनला रात्री ठोशा बुक्यांनी मारहाण करून तिच्या मुलाला व सुनेला जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेची वासळई येथील सर्व्हे नंबर ४८ मधील जागेवर असलेला मेन गेट जेसीबीच्या साह्याने पाडून तसेच आंब्याची, शेवग्याची, केळीची व जांभळाची झाडे आणि लाईटचे पोल जेसीबीने तोडले.आंब्याच्या झाडाला स्वत:च्या नावाचा बोर्ड लावून आरोपी यांनी दोन ट्रॅक्टरच्या साह्याने लोखंडी ग्रील, जाळी, विटा, दगड, केळीची झाडे, आंब्याची झाडे व इतर सामान चोरी करून नेले आहे. डिसिल्व्हा यांनी वसई पोलीस ठाण्यात जाऊन गुरुवारी तक्र ार दिल्यानंतर पोलिसांनी मनसेच्या वसई तालुका उपप्रमुख स्वप्नील नर, वॉल्टर डॉमणिक लोपीस, गिल्डस डॉमणिक लोपीस, राहुल जैस्वाल याच्यासह अनोळखी ३० ते ३५ वयोगटातील पुरुष आणि अनोळखी ५ महिला यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :MNSमनसे