शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भाईंदरमध्ये सदनिकेचा भाग कोसळून दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 14:43 IST

महापालिकेने सदर इमारत ही जुनी झाली असून पडण्याचा धोका असल्याची नोटीस बजावली होती

मीरारोड - भाईंदर पश्चिमेकडील बावन जिनालय जवळील ४० वर्ष जून्या इमारतीच्या एका सदनिकेचा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. रविवारी ( 22 जुलै) रात्री नवपार्श्वनगर - १ या इमारतीच्या सदनिकेचा भाग कोसळल्याने दोन जण जखमी झाले आहेत. तर शुक्रवारी महापालिकेने सदर इमारत ही जुनी झाली असून पडण्याचा धोका असल्याची नोटीस बजावली होती. मात्र रहिवासी अजूनही इमारत रिकामी करण्यास तयार नसल्याने अडचण झाली आहे.  

रविवारी रात्री ९ च्या सुमारास नवपार्श्वनगर क्र. १ या इमारतीच्या बी विंगमधील पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सदनिका क्रमांक १०८ च्या बाल्कनीचा भाग कोसळला. जितेन गंगर हे  सदनिकेत कुटुंबासह राहतात. जितेन हे देखील स्लॅबसह खाली पडल्याने त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. तर एक जण खाली उभा असल्याने त्याच्या अंगावर काही भाग पडल्याने तो देखील किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान मदतीसाठी आले. महापौर डिंपल मेहता, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, माजी महापौर गीता जैन, नगरसेवक रवी व्यास आदीनी पाहणी केली. सदर सदनिका रिकामी करण्यात आली आहे. 

या इमारतीत ३२ सदनिका व २२ दुकाने आहेत. भाजपाचे उत्तन मंडळ महासचिव शैलेश म्हामुणकर यांनीच सदर इमारत धोकादायक अवस्थेत असल्याची तक्रार महापालिकेस केली होती. म्हामुणकर यांच्या तक्रारीनुसार पालिकेने १९ जुलै रोजी इमारतीची पाहणी केली होती. तर २० जुलै रोजीच महापालिकेने इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. इमारतीस भेगा पडल्या असून आतील सळई गंजल्या आहेत. १०४ क्र. च्या सदनिकेच्या गॅलेरीस पण मोठ्या भेगा गेल्याचे म्हटले होते. तर इमारतीची संरचनात्मक तपासणी करून त्याचा अहवाल २९ जुलै पर्यंत सादर करण्यास कळवले होते. इतकेच नव्हे तर या दरम्यान अपघात होऊन मनुष्यहानी झाल्यास त्याची जबाबदारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर निश्चित करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा सुद्धा कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी दिला होता.

दरम्यान इमारतीतील रहिवाशी मात्र इमारत दुरुस्ती करून घेऊ असा पवित्रा घेऊन आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाला असून इमारतीचा भाग किंवा इमारत कोसळल्यास मनुष्यहानी वा जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली आहे. तर काही लोकप्रतिनिधींनी राजकीय हस्तक्षेप सुरु केल्याने पालिकेची देखील कोंडी झाली आहे .  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार