शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

२ मुली अनाथ! विरारमध्ये महिलेची घरात हत्या; आरोपी प्रियकर शेखर कदमला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 06:34 IST

विरारमध्ये महिलेची गळा दाबून हत्या; आरोपी प्रियकराला ठोकल्या बेड्या 

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : विरारमध्ये ३२ वर्षीय विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. येथील प्रथमेशनगरमधील साईनाथ अपार्टमेंटमध्ये धनश्री आंबडस्कर (३२) ही महिला पती रुपेश आंबडस्कर (३७) तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह राहत होती.

सोमवारी सकाळी तिचा पती रुपेश कामावर गेला होता. तसेच दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या. दुपारी धनश्रीचा प्रियकर शेखर कदम तिला भेटायला घरी आला. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्याने धनश्रीची गळा दाबून हत्या केली. काही वेळाने शेखरने शेजाऱ्यांना जमवून ती बेशुद्ध झाल्याचे सांगत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

चौकशीत कबुली पोलिसांनी चौकशी केली असता, दुपारी तिचा प्रियकर शेखर कदम हाच तिला भेटायला घरी आला होता, असे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. याप्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी शेखर कदम विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, याने तिची हत्या का केली? त्यामागे नेमके काय कारण आहे? याचा विरार पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट