शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा-विरारमध्ये १४ नवे कोरोना रुग्ण; बाधितांमध्ये १० महिन्यांचा मुलगाही समाविष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 02:19 IST

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या १९ कोरोनाबाधित रुग्णांवर बोईसर येथील टिमा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात नालासोपारा आणि विरारमध्ये १४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये विरारमधील अवघ्या १० महिन्यांचा मुलगा व नालासोपाऱ्यातून ८ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. दरम्यान, वसई-विरारमधून तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता वसई- विरार मनपा हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या १४८ झाली आहे.

वसई-विरारमधील शनिवारी आढळून आलेल्या १४ बाधित रुग्णांमध्ये विरार व नालासोपारामधील ९ पुरुष आणि ८ वर्षांच्या मुलीसह सहा महिलांचा समावेश आहे. यातील बहुतांश रुग्ण हे हायरिस्क संपर्कातले आहेत. तर विरार पूर्वेतील एक कुटुंबातील ८२ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय व ४८ वर्षीय महिला बाधित असून यांच्यासह सर्व रुग्णांवर नालासोपारा, वसई आणि मुंबईतील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान, वसई-विरार महापालिकेच्या विविध भागात व मुंबईत उपचारासाठी दाखल असलेल्या तीन रुग्णांना शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यात वसई पश्चिमेतील १ आणि विरार पूर्वेतील दोन रुग्णांचा समावेश आहे.बोईसरमध्ये नऊ रुग्णांना डिस्चार्जबोईसर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या १९ कोरोनाबाधित रुग्णांवर बोईसर येथील टिमा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. या ९ कोरोनाबाधित रुग्णांच्या १२ व १४ व्या दिवशी घेण्यात आलेल्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या असून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पालघर तालुक्यातील काटाळे व सफाळे गावातील प्रत्येकी तीन तर डहाणू तालुक्यातील दोन डॉक्टर व नऊ रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या