शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात १६ वर्षांखालील १ हजार ६९३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:07 IST

युवक-युवती बाधित होत असल्याने चिंता

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर जिल्ह्यातील ४५ वयोगटातील ४८ हजार ५६६ नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असून १ हजार ४६९ नागरिकांना दुसरा डोस दिला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने लसीकरण मोहीम काहीशी थंडावली आहे. दरम्यान, जिल्ह्यात १६ वर्षे वर्षांखालील एकूण १ हजार ६९३ जणांना कोरोनाने ग्रासले आहे.पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत अल्पवयीन मुलांचे तसेच तरुणांचे प्रमाण नगण्य होते. आता ते वाढल्याने चिंताही वाढली आहे. जिल्ह्यात १६ वर्षांखालील १ हजार ६९३ रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. एकीकडे पालघर जिल्ह्यातील वसई-विरार परिसरासह आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सध्या जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लसीकरण केले जात आहे. सरकारने अद्याप ४५ वर्षांखालील नागरिकांना लसीकरण करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे लहान मुले तसेच तरुणही बाधित होत असले तरी त्यांना अद्याप लस दिली जात नाही, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

४५ पेक्षा कमी वयाच्या लोकांना दिली जात नाहीजिल्ह्याच्या ग्रामीण भागांत सध्या १६ हजार ४६० लोक कोरोनाने बाधित असून त्यात १६ वर्षांखालील १ हजार ६९३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के आहे. दरम्यान, ४५ पेक्षा कमी वयाचे १० हजार ८११ रुग्ण आहेत. मात्र लसीकरणाचा आदेश नसल्याने त्यांच्या लसीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. १६ ते ४५ या वयोगटातील ९ हजार ४५७ लोक बाधित आहेत. 

मुलांना लस येत नाही, तोपर्यंत निर्बंध पाळा मुलांसाठी लस येत नाही, तोपर्यंत त्या मुलांना कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्बंधाचे पालन करावे लागणार आहे. दुसरीकडे त्यांच्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन अभ्यासाला प्राधान्य देत घरीच राहण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

मुलांमध्ये प्रतिकार शक्ती चांगली असल्याने ते कोरोनाबाधित झाले तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. केंद्र शासन २५ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत प्रयत्नशील आहे. तोपर्यंत मुलांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे व आपली काळजी घ्यावी.- डॉ. आर. व्ही. दिघुले, पालघर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस