शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला देणार १ ते ५ कोटींचा शासकीय निधी, सुनील भुसारा यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:00 IST

gram panchayat : विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील, त्या ग्रामपंचायतीना प्राधान्याने सर्व विभागांचा मिळून जवळपास १ ते ५ कोटीपर्यंतचा शासकीय निधी मिळवून दिला जाईल

मोखाडा -  काही महिन्यांवर ग्रामपंचायत निवडणुका येणार आहेत. अशावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका खेळीमेळीने लोकशाहीच्या उत्सवाप्रमाणे व्हायला हव्यात, मात्र काही लोकांच्या आडमुठेपणामुळे निवडणुका रक्तरंजित होतात. आर्थिक नुकसान होते. याशिवाय नातेसंबंधात वाईटपणाही येतो. यामुळे होता होईल तेवढे प्रयत्न करून निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील, त्या ग्रामपंचायतीना प्राधान्याने सर्व विभागांचा मिळून जवळपास १ ते ५ कोटीपर्यंतचा शासकीय निधी मिळवून दिला जाईल, अशी घोषणा आ. सुनील भुसारा यांनी केली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमानिमित्ताने आयोजित बैठकीप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली आहे. लोकशाही बळकट व्हावी यासाठीच आपला प्रयत्न असून गावागावांत फूट पडू नये, संबंध खराब होऊ नयेत, यासाठीचा हा प्रयत्न असून बिनविरोधच्या निमित्ताने गावचा विकास करण्यासाठी एकप्रकारे एकोपाच निर्माण होणार असल्याने ही घोषणा केल्याचे भुसारा यांनी सांगितले. भुसारा म्हणाले की, राजकारणात आजही निष्ठेला खूप महत्त्व असून मी आज आमदार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे, हेही निष्ठेचे फळ आहे. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळकटी देण्याची जबाबदारी माझी आहे. मात्र, तुम्हीही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून काम करत असताना लोकांची कामे करा. त्यांच्या घरापर्यंत जा. त्यांच्या अडचणी सोडवा. ज्या तुमच्याकडून सुटणार नाही, त्या मला सांगा, पण आपला वेळ लोकांसाठी, समाजासाठी द्या. तुमच्या कामाची दखल पक्ष नक्की घेईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी गटनेते नररेश आकरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर, जि. प. सदस्य हबीब शेख, पं. स. सदस्य लक्ष्मीबाई भुसारा, तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी, उपाध्यक्ष रामदास कोरडे, प्रदेश सदस्य रघुनाथ पवार आदी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतVasai Virarवसई विरार