शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

झेडपीत रचले जाताहेत कारनाम्यांचे मनोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:02 IST

जिल्हा परिषदेत सध्या काही अधिकाऱ्यांनी विविध कारनाम्यांचे मनोरे रचण्याचा प्रकार चालविला आहे. याकडे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने नियमबाह्य कामांना खतपाणी मिळत आहे.

ठळक मुद्देऐकावे ते नवलच : आजच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी जाब विचारणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेत सध्या काही अधिकाऱ्यांनी विविध कारनाम्यांचे मनोरे रचण्याचा प्रकार चालविला आहे. याकडे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने नियमबाह्य कामांना खतपाणी मिळत आहे. जिल्हा परिषदेतून मौखिक आदेश काढायचा आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना इच्छा नसतानाही वस्तू थोपवायच्या, या नव्या उपक्रमात जिल्हा परिषदेने सध्या आघाडी घेतली आहे. यात ग्रामपंचायतच्या निधींचा चुराडा होत असल्याने यावर आवर घालण्यासाठी आवाज उठविला जाणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा परिषदेमार्फत सुरुवातीला ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात उपचार पेट्यांचा वाटप करण्यात आला होता. त्यात ग्रामपंचायतींना नाहक भूर्दंड सहन करावा लागला. दरम्यान समुद्रपूर तालुक्यातील काही शाळांना बायोमॅट्रीक मशीन पुरविण्यात आल्या होत्या. हा सर्व प्रकार पध्दतशीर दडपल्यानंतर पुन्हा अशा सक्तीच्या योजनांना चालना मिळाली. आता ग्रामपंचायतींची मागणी नसतानाही दबावतंत्राचा वापर करुन तशी मागणी ग्रामपंचायतीकडून करवून घेतली. त्या आधारे बहूतांश ग्रामपंचायतींना ७ हजार रुपये किंमतीचे बॅनर थोपविले. तर याही पुढे जाऊन आता ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना वजन काटा देण्याचाही घाट जिल्हा परिषदेने रचला आहे. येथेही मागणी नसताना शाळांकडून मागणी करुन घेतल्याचे दिसून येत आहे. शासनाने ग्रामपंचायतींच्या विकासासाठी थेट निधी उपलब्ध करुन दिला आहे. परंतू जिल्हा परिषदेकडून जबरदस्तीने काही वस्तू थोपवून निधीवर डल्ला मारण्याचे काम चालविले आहे. यातून कंत्राटदाराचं पर्यायाने आपलही चांगभल करण्याचा प्रकार चालविल्याचे दिसून येत आहे. काही कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही काहींना जवळच्या गावी रुजू करुन घेण्यात आले तर काहींना कालावधीपूर्वीच रुजू करुन घेण्यासाठी काही अधिकाºयांनी हालचाली सुरु केल्याची चर्चा आहे. यामुळे सध्या जिल्हा परिषदेत ऐकावे ते नवलच, अशीच स्थिती असल्याने विरोधीपक्ष किंवा सत्ताधारी पक्ष मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना जाब विचारणार का? की अळीमिळी गुपचिळी करणार; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अध्यक्षांच्या विरोधात निधीवरून सदस्य आक्रमक२०१७-१८ व २०१८-१९ या वित्तीय वर्षात सामूहिक विकास कार्यक्रम फंडातून जिल्हा परिषद सदस्यांना निधी वाटप करताना मोठ्या प्रमाणावर असमानता करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्याकडे २ कोटी २७ लक्ष रूपये शिल्लक ठेवले आहे. पदाधिकाºयांना प्रत्येकी ९ लक्ष रूपये वाटण्यात आले. भाजपच्या २३ सदस्यांना ६ लक्ष प्रमाणे १ कोटी ३८ लक्ष तर भाजप समर्थीत सदस्यांना ६ लक्ष रूपयाप्रमाणे ४२ लक्ष रूपये तर कॉँग्रेस व इतर मित्रपक्षाच्या सदस्यांना केवळ प्रत्येकी ४ लक्ष रूपये निधी देण्यात आला आहे. हा अन्याय आहे. संबंधीत निधी हा जिल्हा परिषदेचा स्वत:चा असल्याने त्याचे समान वाटप होणे आवश्यक आहे. मात्र असे न करता अध्यक्ष मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे जि.प. सदस्य मनिष पुसाटे यांनी केला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आपण आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद