शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. कार्यालयासमोर शिक्षकांचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 23:40 IST

सावित्रीबाई फुले विद्यालयातील दोन शिक्षकांना सेवेच्या २५ वर्षानंतर अप्रशिक्षित ठरविण्याचा आदेश तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) पारधी यांनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी काढून त्यांच्यावर अन्यायच केला. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत सदर आदेश मागे घेत आदेश काढणाऱ्या त्या शिक्षणाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, .....

ठळक मुद्देतत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सावित्रीबाई फुले विद्यालयातील दोन शिक्षकांना सेवेच्या २५ वर्षानंतर अप्रशिक्षित ठरविण्याचा आदेश तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) पारधी यांनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी काढून त्यांच्यावर अन्यायच केला. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत सदर आदेश मागे घेत आदेश काढणाऱ्या त्या शिक्षणाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सदर शिक्षकांनी गुरूवारपासून जि.प. समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ द्वारा संचालित शाळांची सेवाज्येष्ठतेबाबतची सुनावणी शिक्षणाधिकारी एस. पी. पारधी यांनी घेतली. त्यामध्ये संस्थेतील शिक्षक खोडे यांनी संस्थेतील शिक्षिका संध्या देशमुख व शिक्षक डी. बी. मोहोड यांना अप्रशिक्षित ठरविण्याची नियमबाह्य मागणी केली. सदर शिक्षक गत २५ वर्षांपासून प्रशिक्षित शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या मान्यतेनुसारच कार्यरत असले तरी त्यांच्या विरोधात हा आदेश पारित करण्यात आला.हा आमच्यावरील अन्याय असल्याचा ठपका ठेवत सदर आदेश मागे घेण्यात यावा. शिवाय या प्रकरणाची चौकशी करून तत्कालीन शिक्षणाधिकाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्या शिक्षकांची आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह अजय भोयर हे करीत असून आंदोलनात अन्यायग्रस्त दोन्ही शिक्षकांसह पुंडलिक नागतोडे, मुकेश इंगोले, अशोक तवले, रहीम शहा, शैलेश भोसले, जयश्री पाटील, भारती हेमडे, विजय भोयर, विनायक चांभारे आदी सहभागी झाले आहेत.न्यायासाठी पंचायत राज समितीच्या अध्यक्षांना निवेदनतत्कालीन शिक्षणाधिकारी पारधी यांनी काढलेला आदेश हा अन्यायकारक आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी सदर आंदोलनकर्त्या शिक्षकांनी निवेदनातून पंचायत राज समितीचे अध्यक्ष पारवे यांना केली आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक