ठळक मुद्देशेतकऱ्याच्या अडचणीत भर
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील झडशी टाकळी येथे पट्टेदार वाघाने बैलाला ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सदर घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाने सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला तातडीने शासकीय मदत द्यावी अशी मागणी आहे.झडशी येथील शेतकरी राहूल कोठाळे यांनी त्यांच्या मालकीचा बैल शेतातील गोठ्यात बांधला होता. सोमवारी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना बैल मृत अवस्थेत दिसला. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता वाघाच्या पावलाचे ठसे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी सदर घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. या घटनेची नोंद वनविभागाने घेतली आहे.