शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गावाच्या विकासाकरिता युवकांची एकजुट आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:16 IST

खेळामुळे युवकांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. यामुळे गावोगावी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात याव्या. जेणेकरून युवकांमध्ये एकीचे बळ निर्माण होईल आणि या एकजुटीतूनच गावाचा विकासही साधता येईल, असे मत माजी राज्यमंत्री तथा आ. रणजीत कांबळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरणजीत कांबळे : सोनेगाव (बाई) येथील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खेळामुळे युवकांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. यामुळे गावोगावी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात याव्या. जेणेकरून युवकांमध्ये एकीचे बळ निर्माण होईल आणि या एकजुटीतूनच गावाचा विकासही साधता येईल, असे मत माजी राज्यमंत्री तथा आ. रणजीत कांबळे यांनी व्यक्त केले.देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोनेगाव (बाई) येथे जय गुरुदेव क्रीडा मंडळाद्वारे ५८ किलो वजनगटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला देवळी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरीश वडतकर, अजय बाळसराफ, माजी पं.स. सदस्य अशोक सराटे, माणिक इंगळे, मनीष थूल, उपसरपंच संजय लोखंडे, ग्रा.पं. सदस्य महेंद्र धोपटे, माजी सरपंच अण्णाजी गोटे, गुणवंत धांदे, डॉ. नरेंद्रकुमार इंगोले, बाबाराव झाडे, संदीप आडकीने, रामकृष्ण उईके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.आ. कांबळे पूढे म्हणाले की, कबड्डी हा खेळ दरम्यानच्या काळात दुर्लक्षित झाला होता; पण आता पुन्हा युवकांचा कल या खेळाकडे वाढला आहे. गावोगावी कबड्डी स्पर्धेचे आयोजन होत आहे. सोनेगावातही युवकांनी मागील पाच ते सहा वर्षांपासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून मातीतील खेळाला प्रोत्साहन दिले आहे. यापूढेही ही स्पर्धा अशीच घेत राहावी. यासाठी आपण मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय सुदृढ आरोग्य या हेतूने युवकांनी गावोगावी व्यायामशाळा निर्माण करावी, त्यासाठीही सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद इंगोले यांनी केले. संचालन अ‍ॅड. मंगेश घुंगरुड यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी सरपंच चंद्रशेखर आडकीने यांनी मानले. सदर स्पर्धेत पंच म्हणून कबड्डीपटू गौतम गोटे, दीपक वैद्य व डॉ. अमर नाखले जबाबदारी सांभाळत आहेत. कार्यक्रमाला गावातील नागरिक तसेच जय गुरुदेव क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.चिमुकला समालोचक ठरला कार्यक्रमाचे आकर्षणकोणतीही स्पर्धा रोमांचक करण्यासाठी जशी खेळाडूंची आवश्यकता असते, तशी समालोचकाचीही भूमिका महत्त्वाची असते. उद्घाटन सामन्याप्रसंगी आ. रणजीत काबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील प्रज्वल वानखेडे या आठव्या वर्गात शिकणाºया चिमुकल्याने हातात माईक घेतला आणि समालोचन सुरु केले. एकीकडे कबड्डीचा सामना रंगत असताना तेवढेच रंगतदार समालोचन हा चिमुकला करु लागल्याने सर्व मान्यवरांचे लक्ष त्याच्याकडे वळले. समयसूचकता व प्रत्येक क्षणाला त्याची शब्दफेक पाहून सर्वांनाच त्याचे कौतुक केल्याशिवाय राहवले नाही. गावात क्रिकेट सामने असो वा कबड्डीचे सामने त्यात हा चिमुकला समालोचक आपली भूमिका बजावत असल्याचे गावकरी सांगतात.

टॅग्स :Ranjit Kambleरणजित कांबळे