शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सोयाबीन एकरी ५ क्विंटलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:47 IST

शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख; पण यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना हे दिवळी बोनस पीक पाहिजे तसे साथ देणार नसल्याची स्थिती आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर हंगामाच्या मध्यंतरी पुन्हा पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा अंदाज : अल्प पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख; पण यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना हे दिवळी बोनस पीक पाहिजे तसे साथ देणार नसल्याची स्थिती आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर हंगामाच्या मध्यंतरी पुन्हा पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला. जिल्ह्यात संध्या काही ठिकाणी अर्ली सोयाबीन सवंगणी व काढणीचे काम सुरू असली तरी यंदा जिल्ह्यात एकरी सरासरी ५ क्विंटलच सोयाबन होईल असा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. उत्पादनातच घट येत असल्याने सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात १२ हजार ३५७ हेक्टर मध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. तर आष्टी तालुक्यात ८ हजार ६७४ हेक्टरवर, कारंजा तालुक्यात १२ हजार ०१५०, वर्धा १८ हजार ८३५, सेलू ११ हजार ४००, देवळी १६ हजार ६५५, हिंगणघाट १५ हजार ५६ तर समुद्रपूर तालुक्यात २० हजार ५४२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली. सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा पेरणी कशी करावी, असाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावत होता. दरम्यान समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला. त्यानंतर वेळोवेळी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकही बऱ्यापैकी वाढले. परंतु, ज्या वेळी सोयाबीन फुलावर आले त्याच वेळी पाऊस बेपत्ता झाला. आॅगस्ट महिन्यात सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने दडी मारली. त्यामुळे शेंगांमध्ये पाहिजे तसे दाणे भरली नाहीत. त्यामुळे सध्या उत्पादनात घट येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अतिशय मेहनत घेवून नापिकीची परिस्थिती ओढावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी पाहिजे तसा पाऊस न झाल्याने याचा विपरीत परिणाम सोयाबीन पिकावर झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सरासरी हेक्टरी १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे आष्टी तालुक्यात सर्वात कमी सोयाबीनचे उतारे येण्याची शक्यता आहे.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.आष्टी तालुक्यात सर्वात कमी उतारेजिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील सोयाबीन पिकांच्या उताऱ्यांचा विचार केला असता हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू, वर्धा, देवळी, आर्वी, कारंजा व आष्टी अशा उतरत्या क्रमानेच तालुक्यांमधील उत्पादनात घट येणार असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्याच्या सरासरीचा विचार केला असता हेक्टरी १२ क्विंटल सोयाबीन होण्याची शक्यता आहे. तर आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी दोन क्विंटलच सोयाबीनचे उत्पन्न होण्याचे भाविक तज्ज्ञांकडून वर्तविले जात आहे.पावसाची माथ्याकडे पाठवर्धा जिल्ह्याचा माथा म्हणून आष्टी व कारंजा तालुका ओळखल्या जातो. परंतु, यंदाच्या वर्षी आतापर्यंत याच परिसराकडे पावसाने पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या परिसरात जलयुक्त शिवार योजनेची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. परंतु, समाधानकारक पाऊसच या परिसरात झाल्या नसल्याने अनेक बांध व बंधारे सध्या तळ दाखवत आहेत. कमी पावसामुळे व भविष्यात जोरदार पाऊस न झाल्यास या भागातील नागरिकांसह शेतकºयांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.नऊ ठिकाणी आढळले भेसळ बियाणेदोन शेतकºयांकडून बियाण्यांमध्ये भेसळ असल्याची तक्रार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. तर कृषी विभागाच्या पाहणीत सात ठिकाणी भेसळ बियाणे आढळून आले आहेत. भेसळ बियाणे साहूर, धाडी, रुद्रापूर आदी ठिकाणी आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभाग सध्या योग्य कार्यवाहीही करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती