शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला व्होटर स्लिप मिळाल्या असत्या तर वाढला असता मतदानाचा टक्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:38 IST

मतदारांमध्ये नाराजीचा सूर : किती कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभेकरिता दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान झाले असून बऱ्याच मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला. ज्यांनी आतापर्यंत सातत्याने मतदानाचा हक्क बजावला, त्यांचेही नावे मतदार यादी मिळाले नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला. इतकेच नाही, तर बहुतांश मतदारांपर्यंत मतदानाच्या दिवसापर्यंत व्होटर स्लिपही मिळाल्या नसल्याने सर्व गोंधळ उडाला. याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी मतदारांकडून करण्यात आली.

वर्धा लोकसभेच्या सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण १६ लाख ८२ हजार ७७१ मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता जिल्हा प्रशासनाने सर्व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रत्येक बीएलओ यांना मतदानापूर्वी सर्व मतदारांना व्होटर स्लिप पोहोचत्या करण्याच्या सूचनाही केल्या होत्या, परंतु बहुतांश भागात मतदारांना व्होटर स्लिपच पोहोचल्या नाही. मतदान केंद्रावरील मतदान यादीत मतदारांना शोधुनही नाव न मिळाल्याने अनेकांना हक्क न बजावताच घरी परतावे लागले. परिणामी, १० लाख ७२ हजार ६५७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभा क्षेत्रातील मतदानाची टक्केवारी ६४.८५ टक्के इतकी राहिली असून सर्वांनाच वेळीच व्होटर स्लिप उपलब्ध झाल्या असत्या, तर ही टक्केवारी आणखी वाढली असती, असेही मतदारांनी बोलून दाखविले. ज्यांच्या हलगर्जीपणामुळे मतदारांना या लोकोत्सवापासून वंचित राहावे लागले, त्याबद्दल कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, पण अद्यापही कुणावरच जबाबदारी निश्चित केली नसल्याची माहिती आहे.

अद्याप नोटीस कुणालाच नाहीमतदानाचा टक्का वाढावा, याकरिता जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली, परंतु प्रशासनातीलच काही चुकांमुळे मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे. मतदारांना व्होटर स्लिप मिळाल्या नसल्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर गेल्यावर मतदार यादीत नाव नसल्याचे कळले. परिणामी, मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागल्याने रोष व्यक्त केला, पण अद्याप एकालाही प्रशासनाकडून नोटीस बजावली नाही आणि जाबही विचारला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

स्लिप ऑनलाईन डाऊनलोड करता येणारमतदानाचा हक्क बजावता यावा, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, याकरिता निवडणूक आयोगाकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. मतदार यादीतील नावे, मतदान केंद्र आदी नावे तपासणीकरिता ऑनलाइन अॅपही उपलब्ध होता, परंतु ग्रामीण भागातील बऱ्याच मतदारांना या सुविधेचा लाभ घेता आला नसल्याने त्यांना व्होटर स्लिप घरपोच देणे क्रमप्राप्त होते.

वाटपासाठी हजार कर्मचाऱ्यांची फौजवर्धा लोकसभा मतदार संघात १ हजार ९९८ मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रत्येक बुथनिहाय बीएलओची नियुक्ती करून त्यांच्या मतदार केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक मतदारांपर्यंत व्होटर स्लिप पोहोच- विण्याची जबाबदारी सोपविली होती. काही बीएल ओनी ही जबाबदारी पार पाडली असून, काहींनी यात कुचराई केल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Votingमतदानwardha-acवर्धा