लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: अखिल भारतीय योग महासंघ व योग पीस संस्थानतर्फे शनिवार ४ मे रोजी जयपूर येथे आयोजित कार्यक्रमात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे श्याम गावंडे यांनी अष्ट वक्रासनात जागतिक विक्रम नोंदवला आहे. त्यांनी १० मिनिटात हे आसन ११४ वेळेस करून दाखवले. त्यांनी प्रथमच योग वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डसमध्ये आपले नाव नोंदवले.योग वर्ल्ड बुक आॅफ रिकॉर्डस चे सीईओ राकेश भारद्वाज यांनी श्याम गावंडे यांना जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. श्याम गावंडे हे आंतरराष्ट्रीय योग चॅम्पियन सुद्धा आहेत. त्यांच्या या विक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. श्याम गावंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच त्यांच्या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, देश-विदेशातील मित्रमंडळी तसेच असोसिएशन आॅफ वर्धा योगा यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.
वर्ध्याच्या श्याम गावंडे यांचा योगासनात जागतिक विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:47 IST
अखिल भारतीय योग महासंघ व योग पीस संस्थानतर्फे शनिवार ४ मे रोजी जयपूर येथे आयोजित कार्यक्रमात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे श्याम गावंडे यांनी अष्ट वक्रासनात जागतिक विक्रम नोंदवला आहे.
वर्ध्याच्या श्याम गावंडे यांचा योगासनात जागतिक विक्रम
ठळक मुद्देअष्ट वक्रासनात नोंदविला उच्चांक