शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

जागतिक पर्यावरण दिन : कलास्पर्शच्या माध्यमातून रंग झाले बोलके

By admin | Updated: June 5, 2016 01:47 IST

पर्यावरणाचे रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी आहे. याकरिता आज प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. सोबतच पाणी व झाडे ...

मर्मस्पर्शी चित्रांतून चिमुकल्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेशवर्धा : पर्यावरणाचे रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी आहे. याकरिता आज प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. सोबतच पाणी व झाडे वाचविण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक आहे. हीच बाब ओळखून आणि लहान मुलांना पर्यावरण रक्षणाची गरज मोठ्यांनी पटवून द्यावी या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पुर्वसंध्येला कलास्पर्श फाऊंडेशनद्वारे चिमुकल्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांतून पर्यावरण बचावचा आगळा वेगळा संदेश देण्यात आला. चित्रकलेच्या उन्हाळी शिबिरात मुलांनी काढलेल्या सुरेख, मार्मिक व अर्थपूर्ण चित्रांमधून हा संदेश थेट काळजाला भिडणारा होता. कलास्पर्श फाऊंडेशनचे संचालक तथा चित्रकार आशिष पोहाणे यांच्या पुढाकाराने १८ एप्रिल ते ६ जून २०१६ या दरम्यान सरस्वती विद्या मंदिर, वर्धा येथे चित्रकला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या देशाला व जगाला भेडसावणारी ‘पाण्याची समस्या’ चित्रातून समाजापुढे मांडली.काय होती चित्रे ?शिबिरातील वैशिष्टट्यपूर्ण अशा २५ जनजागृती संदेश चित्रवृक्षाची निवड करण्यात आली. यामध्ये किमया पोहाणे हिचे ‘पाण्याची सगळे झाले आतूर, होऊ नका देऊ वर्धेचे लातूर’ मयूर चिकटे याचे ‘उंटाच्या पोटाला नळाची तोटी लावलेले’ चित्र, भारताच्या नकाशातून पाण्याचा उपसा आणि शेतकरी आत्महत्येचा मर्म सांगणारे अभय पातोडचे चित्र, प्राजक्ता रासेकर हिने साकारलेले ‘पाण्याच्या प्रत्येक थेंबात निसर्ग हिरवा आहे.’ मंजिरी सरोदेने साकारलेले ‘आटलेल्या विहिरी व आटलेली धरणे’ आणि जन्म ते मृत्यूपर्यंत साथ देणारे पाणी हा संदेश देणारे ऋतुजा गाठे यांची चित्रे लक्षवेधी होती. त्याचबरोबर नमिरा फारूकी, मैथली अंदनकर, अभिर तन्नीरवार, रितीशा गहुकर, नेहा माळोदे, आर्या भगत, यथार्थ जुमडे, मोहीत गेलानी, वेदांत वांदीले, आसावरी वनकर यांची चित्रेही अतिशय संदेशपूर्ण होती.