लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खादी जशी गांधीजींच्या नावाने ओळखली जाते तसेच ग्रामोद्योगासाठी कुमारप्पाजींचे नाव पुढे येते. खादी व ग्रामोद्योगासाठी ओळखले जाणारे मगनसंग्रहालय समितीत ‘पर्यावरण की अर्थशास्त्री मधुमख्यी’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञ मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून गोपाल पालीवाल तर प्रमुख अतिथी म्हणून मगनसंग्रहालयाच्या डॉ. विभा गुप्ता यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कुमारप्पाजींच्या आर्थिक तत्त्वज्ञानावर अतिशय मार्मिक विवेचन समजावून सांगितले. गोपाल पालीवाल यांनी २० वर्षे पेक्षा जास्त काळ मधमाशी या विषयावर काम व संशोधन केले आहे. मधमाशी व अहिंसक मध संकलन यासाठी महाराष्ट्रातील अनेक आदिवासीयांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे.अहिंसक पद्धतीने मध काढण्यासाठी जे साहित्य वापरले जाते त्याचे प्रात्यक्षिक पालीवाल यांनी यावेळी विद्यार्थ्यांना करून दाखविले. अतिशय साधे पण रोचक पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण व मधमाशी यांचे महत्व या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पालीवाल यांनी दिली. शिवाय पालीवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मध कसे आरोग्यासाठी फायद्याचे आहे याचीही माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मगनसग्रहायातील सुषमा सोनटक्के यांनी केले. यशस्वीतेकरिता मगनसंग्रहालयातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.
‘पर्यावरण की अर्थशास्त्री मधुमख्खी’वर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:06 IST
खादी जशी गांधीजींच्या नावाने ओळखली जाते तसेच ग्रामोद्योगासाठी कुमारप्पाजींचे नाव पुढे येते. खादी व ग्रामोद्योगासाठी ओळखले जाणारे मगनसंग्रहालय समितीत ‘पर्यावरण की अर्थशास्त्री मधुमख्यी’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
‘पर्यावरण की अर्थशास्त्री मधुमख्खी’वर कार्यशाळा
ठळक मुद्देतज्ज्ञांनी केले मार्गदर्शन : मगनसंग्रहालयातील विशेष उपक्रम