शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘गाळमुक्त धरणा’ची कामे केवळ ४.८० टक्केच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:18 IST

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे सध्या केवळ ४.८० टक्के काम झाले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ४८ पैकी केवळ २० कामे सुरू, कामांना वेळीच गती देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे सध्या केवळ ४.८० टक्के काम झाले आहे.हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील गाव तलाव गाळमुक्त करण्याचे काम सध्या ४०.५८ टक्के पूर्ण झाले आहे. तर याच तालुक्यातील लघुसिंचन तलाव धामणगावचे काम ३.३३ टक्के झाले आहे. साठवण तलाव आर्वी (छ.) ५५.५६ टक्के झाले. तर लघुसिंचन तलाव सेलू (मु.), गाव तलाव चिकमोह, पाझर तलाव उमरी (येंडे), साठवण तलाव कानगाव व साठवण तलाव भैय्यापूरचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. शिवाय समुद्रपूर तालुक्यातील गावतलाव साखरा २३.३३ टक्के, गाव तलाव पिंपळगाव ७६.६७ टक्के, साठवण तलाव गिरड-१०.० टक्के, गावतलाव समुद्रपूर ५.५० टक्के, लघुसिंचन तलाव नंदोरी ६.०० टक्के, पाझर तलाव मंगरूळ ३.३३ टक्के काम झाले आहे. तर साठवण तलाव पिंपरी, साठवण तलाव गिरड-२, गावतलाव दसोडा-२, गावतलाव कानकाटी येथून गाळ काढण्यास सुरूवात करण्यात आलेली नाही. देवळी तालुक्यातील गाव तलाव कोळोणा (चो.) ६०.०० टक्के, पाझर तलाव कोल्हापूर (राव) १४.०० टक्के काम झाले आहे. तर पाझर तलाव गौळ येथून मुठभरही गाळ काढण्यात आलेला नाही.आष्टी तालुक्यातील लघुसिंचन तलाव पांढुर्णा, पाझर तलाव तळेगाव (श्या.पंत.), साठवण तलाव इंदरमारी येथून एक मिटरही गाळ काढण्यात आलेला नाही. आर्वी तालुक्यातील पाझर तलाव आजनगाव ३५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर पाझरतलाव सालधरा, पाझर तलाव पांझरा (बो.), लघुसिंचन तलाव काकडधरा, लघुसिंचन तलाव गौरखेडा येथून गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही. लघुसिंचन तलाव आजनादेवी ३० टक्के, लघुसिंचन तलाव ठाणेगाव २ टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर लघुसिंचन तलाव पिपरी, पाझर तलाव आगरगाव, गावतलाव बांगडापूर, लघुसिंचन तलाव सेलगाव, लघुसिंचन तलाव सुसुंद्रा, साठवण तलाव बोंदरठाणा येथून गाळ काढण्यात आलेला नाही.केळझरच्या दोन तलावातून काढला १०० टक्के गाळसेलू तालुक्यातील गाव तलाव केळझर व गणेश तलाव केळझर येथून १०० टक्के गाळ काढण्यात आला आहे. असे असले तरी गाव तलाव सोंडी, ल.पा. तलाव पांझरा बोधली, ल.पा. तलाव कुºहा, ल.पा. तलाव दहेगाव (गोंडी), ल.पा. तलाव आष्टी, सेलू तालुक्यातील मदन प्रकल्प, समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प, कारंजा तालुक्यातील कार नदी प्रकल्प, आर्वी तालुक्यातील सुकळी ल.पा. प्रकल्पातून मुठभरली गाळ काढण्यात आलेला नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई