शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

पावसाळ्यातील रस्त्याचे काम नागरिकांनी पाडले बंद

By admin | Updated: June 21, 2015 02:26 IST

तळेगाव -आष्टी -दुर्गवाडा या मार्गावरील साहूर ते दुर्गवाडा या दोन कि़मी. रोड पूर्ण उखडला होता.

तळेगाव (श्या.पंत.): तळेगाव -आष्टी -दुर्गवाडा या मार्गावरील साहूर ते दुर्गवाडा या दोन कि़मी. रोड पूर्ण उखडला होता. पावसापूर्वी या रस्त्याचे बि.यु.जी. चे ६०० मिटरचे काम झाले. पण उर्वरीत काम भर पावसात सुरू करण्यात आले. त्यामुळे पावसातील रस्त्याच्या कामाचा दर्जा काय, असा प्रश्न उपस्थित करीत स्थानिक ग्रामस्थांनी सदर काम बंद पाडले. प्राप्त माहितीनुसार, संजय कंस्ट्रक्शन कंपनी परतवाडा यांना साहूर ते दुर्गवाडा या २ कि.मी. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम देण्यात आले. शासन धोरणानुसार १५ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत पावसाळा असल्याने डांबरीकरणाचे काम करता येत नाही. पाण्याचा थोडा जरी लवलेश असला तरी डांबर रस्त्यावर न चिपकता लगेचच उखडत जाते. नेमकी हीच परिस्थिती साहूर-दुर्गवाडा रस्त्यावर आहे. साहूर धाडी, दुर्गवाडा परिसरात १५ दिवसांपासून सारखा पाऊस सुरू असून साहूर-दुर्गवाडा रस्त्यावर पाण्याचे डबके साचले असताना संजय कंट्रक्शनकडून शासनाचे नियम धाब्यावर बसवून भर पावसात व रोडवर साचलेल्या डबक्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत हे काम अधिकाऱ्यांच्या कमिशनच्या साखळीत अडकल्याची चर्चा गावात आहे. आताही शासनाने नियम धाब्यावर ठेवून १५ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत कामास मंजुरी देण्यात आली. आष्टी येथील सा. बां. विभागाचे उपविभागीय अभियंता लभाने यांच्या कार्यकाळातील हे काम असून ७ जून रोजी ते बदलून गेले. त्यानंतर सदर कार्यभार ९ जूनला विवेक पेन्दे यांच्याकडे आला असून कार्यकारी अभियंता जुमडे, मेहता यांच्या मार्गदर्शनात डांबरी रस्त्याचे कामास परवानगी देण्यात आली. तळेगाव ते आष्टी-दुर्गवाडा या मार्गावर जागोजागी खड्डे व काही ठिकाणी रोड पूर्णपणे उखडला आहे. हे खड्डे न बुजाविता सदर उपविभागीय अभियंता पेन्दे यांना ६०० मिटर रोड बनविण्याची भर पावसाळ्यात घाई का झाली असा प्रश्न गामस्थांना पडला. सदर उपविभागीय अभियंता ९ जूनला आष्टी सा. बां. विभागात रूजू झाले. त्यांनी आल्या आल्या या रोडवर एक कंट्रक्शन कंपनी बि.यु.जी.चे काम करत असताना ते काम बंद केले. पण आजच्या तारखेला ६०० मीटर उष्णमिश्रीम डांबरीकरणाचे काम भर पावसाळ्यात सुरू केल्याने ग्रासस्थांनी ते बंद पाडले. विशेष म्हणजे सदर कामाचे मोजमाप पुस्तिकेवर येथून कार्यमुक्त झालेले लभाणे यांची स्वाक्षरी राहिल की पेन्दे यांची हे एक कोडेच आहे.(वार्ताहर)