लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : मागील दोन वर्षांपासून सेवाग्राम-हमदापूर या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. हे काम मोठ्या प्रमाणावर अनियमितपणे सुरू असल्याने रविवारी झालेल्या पावसादरम्यान महामार्गालगत शेत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने त्यांचे पीक पूर्णत: पाण्यात बुडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.वडाळा ते हमदापूर शिवारात मध्यंतरी समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीनची पेरणी केली. दोन वर्षांपासून सेवाग्राम हमदापूर पुढे कांढळीपर्यंतच्या रोडचे काम सुरू झालेले आहे. यात रूंदीकरण तर शिवनगर, चानकी आणि कोपरा शिवारात गिट्टी टाकून पसरविण्यात आल्याने रस्ता उंच झाला. अशातच रविवारी सायंकाळी परिसरात मुसळधार पाऊस झाला. शिवाय पावसाचे पाणी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात शिरल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. याच पाण्यात पेरलेले बियाणे आणि अंकुरलेले पीक दबल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शिवाय शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असल्याचे गणेश कोणे, अरविंद पन्नासे यांनी सांगितले.मी १८ एकरात सोयाबीनची लागवड केली. अशातच रविवारी झालेल्या पावसादरम्यान रस्ता उंच असल्याने पावसाचे पाणी थेट शेतात शिरले. यामुळे दीड एकरातील सोयाबीन पिकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात शिरल्याने माझ्या सारखेच परिसरातील अनेक शेतकºयांचे नुकसान झाले आहे.- श्रीकांत राऊत, शेतकरी, चाणकी.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेती झाली जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST
वडाळा ते हमदापूर शिवारात मध्यंतरी समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीनची पेरणी केली. दोन वर्षांपासून सेवाग्राम हमदापूर पुढे कांढळीपर्यंतच्या रोडचे काम सुरू झालेले आहे. यात रूंदीकरण तर शिवनगर, चानकी आणि कोपरा शिवारात गिट्टी टाकून पसरविण्यात आल्याने रस्ता उंच झाला. अशातच रविवारी सायंकाळी परिसरात मुसळधार पाऊस झाला.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेती झाली जलमय
ठळक मुद्देओढवले दुबार पेरणीचे संकट : अर्धवट रस्ता कामाचा परिणाम