शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

बापूराव देशमुखांचे कार्य लोकांपर्यंत जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:11 IST

शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्याव्यतिरिक्त बापूराव देशमुखांचे सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्यही मोठे आहे. ते पुढे आले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून दाआजींनी ज्यांच्यासाठी काम केले त्या बहुजनापर्यंत ते कार्य जायला हवे, .....

ठळक मुद्देसुरेश देशमुख : सहकार महर्षी बापूराव देशमुख पुस्तकाचे प्रकाशन

ऑनलाईन लोकमतवर्धा : शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्याव्यतिरिक्त बापूराव देशमुखांचे सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्यही मोठे आहे. ते पुढे आले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून दाआजींनी ज्यांच्यासाठी काम केले त्या बहुजनापर्यंत ते कार्य जायला हवे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी केले. स्थानिक प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर माजी आमदार वसंतराव कार्लेकर, बापूराव देशमुख फाऊंडेशनचे अध्यक्ष शरद देशमुख, सचिव डॉ. भा.की. खडसे, सुधीर गवळी, प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, डॉ. मालिनी वडतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मालिनी वडतकर लिखित सहकार महर्षी बापूरावजी देशमुख या पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले.डॉ. कासारे म्हणाले की, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून आपल्या विदर्भातील पंजाबराव देशमुख यांच्यापर्यंतच्या समाजसुधारकानी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्योत नेली. त्या सर्व कर्मवीर, थोर शिक्षण महर्षीच्या परंपरेतील अलीकडच्या काळातील लोक नेते म्हणजे बापूराव देशमुख होते, असे सांगितले.डॉ. भा.की. खडसे यांनी जिल्ह्यावर मालगुजार श्रीमंताचा प्रभाव असताना तो दूर सारीत गाव खेड्यातील बहुजन, ग्रामीण तरूण नेतृत्वाला पुढे आणण्याचे कार्य बापूराव देशमुख यांनी केले. सर्व जातीपातीच्या सामान्य लोकांना सोबत घेऊन ते जात असे सांगितले. यावेळी माजी आमदार वसंतराव कार्लेकर, व सुधीर गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरेश देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. वडतकर यांनी केले. डॉ. अरूणा हरर्ले यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. अनिता देशमुख यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. रंभा सोनाये यांनी मानले. यावेळी सहकार क्षेत्रातील मान्यवर व वर्धेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.